शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

CoronaVirus News: कृपया, सोशल डिस्टन्सिंग पाळा; महापौर, आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:47 IST

ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी घराबाहेर न जाण्याच्या सूचना

कल्याण : ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत केडीएमसी परिक्षेत्रात काही ठरावीक वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यासंदर्भात सांगूनही तसे होत नसल्याने दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ही चिंताजनक बाब असून सोशल डिस्टन्सच्या सूचना पाळा, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असे आवाहन कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकानदारांसह नागरिकांना केले आहे.महापालिका क्षेत्रात अनलॉक-१ मध्ये ५ जूनपासून सम-विषम तारखांप्रमाणे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्स आणि अन्य अटींच्या आधारे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्स धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणीही नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही.एकीकडे कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना त्याचे कोणतेही गांभीर्य नागरिकांना राहिलेले नसल्याचे एकूणच शहरातील वास्तव पाहता स्पष्ट होत आहे. महापौर राणे आणि आयुक्त सूर्यवंशी यांनी शनिवारी संयुक्त परिपत्रक जारी करून दुकानदार आणि नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे सांगताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाऊ नका, याकडेही परिपत्रकात लक्ष वेधले आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.कल्याणमध्ये दूधविक्रीलाही वेळेचे बंधनकल्याण येथील दूधनाका परिसरात दूधविक्रीवरही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेतच दूधविक्री करता येणार आहे. तसेच, बाहेरील व्यक्तींना दूधखरेदी करण्यास मनाई केली आहे.दूधनाक्यासह मौलवी कम्पाउंड, रोहिदासवाडा, अन्सारी चौक, मोहल्ल्यातील मच्छीबाजार, रेतीबंदर परिसर, टेकडी कबरस्तान आदी ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत.मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये, क्लिनिक, गॅस सिलिंडरपुरवठा यांना बंदी लागू राहणार नाही. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत बेकरी, दुधाची डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी दुकाने वगळता अन्य सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका