Coronavirus news: Online yoga class for Corona patients at Global Hospital, Thane | Coronavirus news: ठाण्याच्या ग्लोबल रुग्णालयात कोरोना रु ग्णांसाठी आॅनलाइन योगा वर्ग

महापौर नरेश म्हस्के यांची संकल्पना

ठळक मुद्दे महापौर नरेश म्हस्के यांची संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महापालिकेतर्फे सुरू केलेल्या ग्लोबल रु ग्णालयात आता महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून महापालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी आॅनलाईन योगा वर्ग सुरू केले आहेत. कोरोना आजार श्वसनाशी निगडीत असल्यामुळे योग आणि प्राणायाम याचा फायदा रूग्णांना होत असल्यामुळे ठाण्यातील घंटाळी योग मित्र मंडळाच्या सहकार्याने हे वर्ग सुरु केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
या आॅनलाईन योगवर्गाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर, योग शिक्षक श्रीकृष्ण म्हस्कर, गणेश अंबिके आदी उपस्थित होते.
कोविड १९ या आजारावर अद्याप लस आलेली नाही. मात्र, त्यावर भारतीय उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा वापर विविध स्तरावर करण्यात येत आहे.
यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी त्याचबरोबर प्लाझ्मा आणि योग साधना हेही प्रभावी ठरत आहे. कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याने रु ग्णांना त्याची लागण झाल्यास श्वसनाला त्रास होतो त्याचबरोबर आजार बरा झाल्यानंतरही श्वसन यंत्रणा पूर्ववत होण्यास विलंब होतो. यावर योग, आणि प्राणायम उपयुक्त ठरत असून श्वसन यंत्रणेचे हे व्यायाम रु ग्णांना कोविड मधून बरे करण्यात मदत करतात. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रु ग्णालयामध्ये आॅनलाइन पद्धतीने योग्य वर्ग घेण्याची सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी मांडली. ती पालिका प्रशासनाने मान्य करून १७ आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने हे योग वर्ग सुरू केले आहेत. ओमकार, प्राणायम, योगाची सोपी आसणे रु ग्णांकडून करु न घेतली जात आहेत. ठाण्याच्या अंबिका योग कुटीरचे योग प्रशिक्षक हे वर्ग रोज संध्याकाळी आॅनलाइन पद्धतीने घेतात. या निमित्ताने रु ग्णांशी संवाद साधून त्यांचे मानसिक आरोग्य सृदृढ करण्याबरोबरच मनोधैर्य वाढविण्यात येत असल्याचे ही योग प्रशिक्षक गणेश अंबिके यांनी सांगितले. या उपक्र माला रु ग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून याचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात दिसतील. योगाचा रु ग्णांना नक्की फायदा होईल, असे महपौर म्हस्के यांनी सांगितले. या योग वर्गाचा फायदा जास्तीत जास्त रूग्णांना व्हावा यासाठी उपायुक्त विश्वनाथ केळकर, ग्लोबल रूग्णालयाचे डॉ, अनिरु ध्द माळगांवकर, घंटाळी योग मंडळाचे गणेश अंबिके विशेष मेहनत घेत आहेत.
दरम्यान, योग उपचार पध्दती श्वसनाच्या आजारावर उपयुक्त ठरत असून जे रु ग्ण कोविड आजारातून नुकतेच बरे होऊन घरी गेले आहेत किंवा होम कॉरंटाईन आहेत, अशा रु ग्णांनी सुद्धा योगा करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Web Title: Coronavirus news: Online yoga class for Corona patients at Global Hospital, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.