शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या वर!   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 9:14 PM

CoronaVirus News : ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देअंबरनाथ शहरात २६ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. आज  एकही मृत्यू झाला नाही.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दोन लाख ४७० चा आकडा आजपर्यंत गाठला आहे. यात रविवारी सापडलेल्या एक हजार ८३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात २५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात आता पाच हजार ७० मृत्यूची संख्या झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.  

ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १०४ झाली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात २९३ रुग्ण नव्याने आढळून आले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४७ हजार ८८८ रुग्ण बाधित असून आजपर्यंत ९५५ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला रविवारी २९ नवे रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता नऊ हजार ८५५ रुग्ण बाधित असून मृत्यू संख्या ३२४ झाली आहे. भिवंडी मनपा. परिसरात ३६ रुग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. येथे पाच हजार ६६९ बाधीतांची तर, ३२८ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ७९ नवे रुग्णं आणि चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २१ हजार २९१ बाधितांसह ६७१ मृतांची नोंद झाली आहे. 

अंबरनाथ शहरात २६ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. आज  एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता सहा हजार ९९४ बाधितांसह २५८ मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. बदलापूर परिसरामध्ये ४६ रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण सहा हजार ९५६ झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ६९ रुग्णांचा आज शोध लागला असून दोन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ३४ बाधीत झाले असून ४८७ जणांचा मृत्यू झालेला आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे