CoronaVirus News: ब्रिटनहून आलेल्या एकास नव्या कोरोनाची लागण; घरीच उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:54 IST2020-12-31T01:00:44+5:302020-12-31T06:54:05+5:30

घरीच उपचार सुरू; १२ नागरिक सापडले

CoronaVirus News: New corona infection in UK | CoronaVirus News: ब्रिटनहून आलेल्या एकास नव्या कोरोनाची लागण; घरीच उपचार सुरू

CoronaVirus News: ब्रिटनहून आलेल्या एकास नव्या कोरोनाची लागण; घरीच उपचार सुरू

ठाणे : युरोपीयन देशातून आलेल्या  २३५ नागरिकांपैकी केवळ एकाला कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२ नागरिकांचा शोध लागला नसल्याने महापालिकेची चिंता वाढली होती. पालिकेने शोधमोहीम तीव्र करुन अखेर त्यांना गाठल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला.

ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर आता संपूर्ण देशात अशा युरोपीयन देशांमधून आलेल्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. २० नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत आलेल्यांचा शोध सध्या सुरू आहे. ठाण्यात या देशातून तब्बल २३५ नागरिक आतापर्यंत आले असून, त्यांचा पाच दिवसांपासून शोध सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

२२३ नागरिकांचा शोध घेण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. मात्र १२ जणांचा शोध घेणे कठीण झाले होते. अखेर शोधमोहीम तीव्र करुन पालिकेने बुधवारी त्यांना शोधून काढले. त्यापैकी एकाला कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्याची प्रकृती स्थिर असून घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.
 

Web Title: CoronaVirus News: New corona infection in UK