शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

CoronaVirus News: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळते सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 1:10 AM

कोरोनाचे संकट आले आणि या महामारीत आरोग्यसेवेवर ताण वाढू लागला. परंतु, या परिस्थितीतही शासकीय असो वा महापालिका किंवा खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे एखाद्या योद्धयासारखे लढताना दिसत आहेत.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : कोविडच्या परिस्थितीत काम करत असताना डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांना शारीरिक आणि मानसिक ताणाला सामोरे जावे लागत असले, तरी कर्तव्य प्रथम या तत्त्वावर ते काम करीत आहेत. आजारी पडू नये म्हणून ते स्वत:ची पुरेशी काळजी घेत असून रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पौष्टिक आहारावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट आले आणि या महामारीत आरोग्यसेवेवर ताण वाढू लागला. परंतु, या परिस्थितीतही शासकीय असो वा महापालिका किंवा खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे एखाद्या योद्धयासारखे लढताना दिसत आहेत. रुग्णांची काळजी घेत असताना त्यांनाही शारीरिक-मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.आरोग्यसेवेत काम करणाºया या योद्धयांना विश्रांतीचीही नितांत गरज असते. त्यामुळे त्यांना सुटी दिली जाते. तसेच, त्यांच्या आहाराकडेही लक्ष दिले जाते. त्यांना प्रथिनयुक्त आहार, न्यूट्रिशन घेण्याचे सल्ले हॉस्पिटलकडून दिले जातात. सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांवर ताण येऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. तेथे सात दिवस काम आणि सात दिवस सुटी दिली जाते. संसर्ग होऊ नये म्हणून ही सुटी दिली जाते. एखाद्यावेळी रुग्ण वाढले तरीही सुटीवरील कर्मचाºयाला बोलविण्याची वेळ आलेली नाही. परस्पर व्यवस्था केली जाते आणि पर्याय म्हणून एक ते दोन कर्मचाºयांची व्यवस्थाही केली आहे. एखाद्या कर्मचाºयाच्या घरात वैयक्तिक अडचण आली, तर त्याला अडवून ठेवले जात नाही. घरी जाण्याची मुभा आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिसेविका प्रतिभा बरडे यांनी दिली. कोविड रुग्णांसाठी काम करणे ही रिस्क असली, तरी प्रत्येक जण काम करीत आहे. ताण तर आहेच. आठवड्यात ४८ तास काम कर्मचाºयाने करायचे असते आणि दोन दिवस सुटी दिली जाते. बाहेरूनही आरोग्य कर्मचारी मागविण्यात आले आहेत.परस्परांत सांभाळून घेतले जातेकर्मचाºयांची संख्या दुप्पट केली आहे, असे खाजगी रुग्णालयाचे डॉ. अमोल गीते यांनी सांगितले. वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी, अ‍ॅण्टीजेन तपासणी, तापाचे रुग्ण तपासले जातात. येथे काम करणाºया कर्मचाºयांची संख्या पुरेशी आहे. येथे रुग्णाला दाखल करून घेतले जात नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा सुटी दिली जाते. अधिक कर्मचारी आम्ही मागविले नाहीत.त्यांच्यात आम्ही व्यवस्था करतो, असे वाडिया हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनी देशपांडे यांनी सांगितले. कोविड सेंटरमध्ये काम करणाºया डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यावर कामाचा ताण येतो. त्यांना दोन दिवसांची सुटी दिली जाते. जिथे १० लोकांची गरज आहे आणि पाच लोक असतील, तर तो ताण वाढतो. परंत,ु आठ ते नऊ लोक असतील तेव्हा आपापसांत संभाळून घेतले जात,े असे ठाणे महापालिका आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.