शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 00:24 IST

सर्वच स्थानकांवर पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : अडीच महिन्यांनी प्रथमच सुटली डहाणूहून मुंबईसाठी गाडी, दळणवळण काही रुळांवर

पालघर/बोर्डी : लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अडीच महिन्यांनी डहाणूहून मुंबईकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ५ वाजता धावली तर डहाणू आगारानेही दिवसाला दोन एस.टी. गाड्यांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे डहाणू ते मुंबई दरम्यानचे दळणवळण काही अंशी पुन्हा रुळावर आले असले तरी पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद दिसला. दरम्यान, प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दळणवळण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामध्ये लोकल सेवेचाही समावेश होता. नंतरच्या काळात लॉकडाऊन शिथिल केल्यावर गरजेनुसार काही प्रवासी साधनांना बंदीतून सूट देण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू झाली नव्हती. त्यासाठी जिल्ह्यातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाºया नोकरदारांना स्वत:चे वाहन किंवा पालघर येथून सोडण्यात येणाºया एस.टी.चा आधार घ्यावा लागत होता.दरम्यान, अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवार १५ जूनपासून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवा बजावणाºया बारा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध केली आहे. त्यानुसार डहाणू रोडहून मुंबईकडे जाणाºया आठ आणि मुंबईहून या स्थानकात येणाºया आठ अशा एकूण सोळा लोकल धावणार आहेत. त्याचे वेळापत्रक आणि या सेवेचा कोणाला लाभ घेता येणार आहे, त्यांना आवश्यक कागदपत्रे व नियमावलींची माहिती उपलब्ध केली आहे. डहाणूहून सोमवारी पहाटे ५ वाजता पहिली लोकल मुंबईच्या दिशेने धावली. त्यामध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला. ७.०५ वाजताच्या दुसºया लोकलमध्ये दोन प्रवासी, तर ९.३५ च्या तिसºया लोकलला पाच ते सहा प्रवाशी संख्या होती. या सर्व लोकल गाड्यांनी पूर्वीप्रमाणेच डहाणू रोड, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे, सफाळे, वैतरणा आणि विरार या स्थानकात थांबा घेतला. परंतु कमी प्रवासी संख्येची परिस्थिती पालघर आणि अन्य स्थानकादरम्यान दिसून आली. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी वसई, मुंबई आणि उपनगरात जाणाºया नोकरदारांनी खाजगी वाहने भाडेतत्त्वावर घेतल्याने लोकलमधील प्रवाशी संख्या कमी असून काही दिवसात ती वाढेल असे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.दरम्यान, दुसºया टप्प्यात बँक, बांधकाम यासह अन्य क्षेत्रातील नोकरदारांना संधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.डोंबिवलीमधून सुटल्या ४०० ऐवजी २१० लालपरीडोंबिवली : लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाºयांकरिता असतानाही सोमवारी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातून २१० बसगाड्या सोडण्यात आल्या. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ४०० च्या आसपास बसगाड्या सोडण्यात येत होत्या.लोकल सुरूझाल्याचे निमित्त करून बस कमी केल्याचा सर्वाधिक फटका खासगी कंपन्यांमधील कर्मचाºयांना बसला. मंत्रालय, ठाणे, बदलापूर, सायन, जेजे मार्गावर या बस सोडल्या. काहींनी लोकल मिळेल, याची शाश्वती नसल्याने बसने जाणे पसंत केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वे