शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News : माणुसकी हरवली! मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचाच नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:30 IST

तर सख्या भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे.

ठाणे : कोरोनामुळे सध्या नातीगोती आणि माणुसकीचे अनेक चांगलेवाईट अनुभव समोर येत आहेत. कोरोनाच्या धास्तीने इतर आजारांनी बळी पडलेल्यांच्या नशिबीही मृत्यूनंतर दु:स्वास येत आहे. ठाण्यातील शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक समाजसेवकांनी सरकारी रु ग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातलग व निकटवर्तीयांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तर सख्या भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे.ठाणे पूर्वेकडील पारशीवाडीतील बाळ सराफ चाळीनजीकच्या घरात एक ५८ वर्षीय गृहस्थ एकटेच राहतात. खासगी बिल्डरकडे नोकरी करून उदरिनर्वाह करणाऱ्या या गृहस्थास कंबरेच्या खाली शारीरीक व्याधी जडली होती. हा आजार बळावल्याने ते घरातच तडफडत होते. याची माहिती मिळताच १७ जून रोजी मध्यरात्री काँग्रेसचे स्थानिक समाजसेवक कृष्णा भुजबळ यांनी तत्काळ धाव घेऊन काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज शिंदे व शिवसेनेच्या हेमंत पमनानी आदिंच्या सहकार्याने त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ हलवले. परंतु, कोरोना नसतानाही उपचारादरम्यान १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.>मृताच्या घरास टाळे लावूनभावाने ठोकली धूमरुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच पुन्हा भुजबळ यांनी रु ग्णालय गाठून मृताचे भाऊ, जावई व नातलगांना कळवले. मात्र, साऱ्यांनीच पाठ फिरवली. अखेर महाड येथील सख्ख्या भावाला मृताच्या नावावर घर असल्याचे कळवताच घराच्या लोभाने रु ग्णाचा भाऊ ठाण्यात अवतरला. परंतु, रु ग्णालयातून शव ताब्यात घेण्याऐवजी या लोभी भावाने नात्यागोत्याला काळिमा फासून मृत भावाच्या पारशीवाडीतील घराला टाळे लावून चक्क धूम ठोकली.>चार दिवसांपासून मृतदेह पडूनवारंवार फोन करूनही नातलग येत नसल्याने मृताचे शेजारीपाजारी संतापले असून सख्खा भाऊदेखील जबाबदारी स्वीकारायला तयार नसल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. यामुळे चार दिवसांपासून त्यांचा मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारातच बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस