शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : अंबरनाथ, बदलापूरमधील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट रखडले; उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 20:15 IST

CoronaVirus News : अंबरनाथ शहरात सध्या १ हजार २१३ निकाल प्रलंबित आहेत. तर बदलापूर शहरात सध्या २५० चाचण्यांचे निकाल प्रलंबित आहेत. 

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कोरोना चाचणीचे नमुने तपासणाऱ्या लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट गेल्या दोन दिवसांपासून रखडले आहेत. (CoronaVirus News : Covid test report stalled in Ambernath, Badlapur; Time to send samples to Ulhasnagar lab)

बदलापूरला शासनाच्यावतीने कोव्हिड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली होती. एक एनजीओ ही लॅब चालवत असून त्यात अंबरनाथ आणि बदलापूरमधील आरटी पीसीआर चाचण्यांचे नमुने तपासले जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या लॅबमधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे निकाल प्रलंबित आहेत. 

बदलापूरमध्ये दिवसाला २०० ते २५० आणि अंबरनाथमध्ये दिवसाला जवळपास ४०० संशयितांच्या आरटी पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र या चाचण्यांचे नमुने तपासलेच जाऊ शकत नसल्याने सगळे निकाल प्रलंबित आहेत. अंबरनाथ शहरात सध्या १ हजार २१३ निकाल प्रलंबित आहेत. तर बदलापूर शहरात सध्या २५० चाचण्यांचे निकाल प्रलंबित आहेत. 

बदलापूरचे लॅब बंद असल्याने हे नमुने सध्या पडघा, ठाणे, उल्हासनगर इथल्या सरकारी लॅबमध्ये, तसेच कल्याणच्या एका खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. मात्र खासगी लॅबमध्ये एका चाचणीला ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असून हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे.

टेस्टिंग लॅबच्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तीन ते चार टेस्ट रिपोर्ट येणार नाहीत. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.  - डॉ. राजेश अंकुश, वैद्यकीय अधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद

 लॅब बंद झाली असली तरी चाचणी पडघा आणि ठाणे येथे पाठवून त्याचे लगेच रिपोर्ट घेतले जात आहेत. रिपोर्ट येण्यास थोडा विलंब होईल परंतु काम थांबलेले नाही. - डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस