CoronaVirus News: ठाण्यात कोरोनाचे दिवसभरात 1561 बाधितांसह सर्वाधिक 34 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:22 PM2020-06-29T20:22:54+5:302020-06-29T20:23:00+5:30

दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल 435 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्या खोलाखाल ठाण्यात 338 नवीन बाधीत रुग्ण आढळले आहेत.

CoronaVirus News: Corona in Thane kills 34 people, including 1561 infected in a day | CoronaVirus News: ठाण्यात कोरोनाचे दिवसभरात 1561 बाधितांसह सर्वाधिक 34 जणांचा मृत्यू

CoronaVirus News: ठाण्यात कोरोनाचे दिवसभरात 1561 बाधितांसह सर्वाधिक 34 जणांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाणे  जिल्ह्यात सोमवारी कोरोना बाधीत रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. दिवसभरात 1561 बाधितांची तर, 34 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 31 हजार 850 तर मृतांची संख्या 1020 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल 435 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्या खोलाखाल ठाण्यात 338 नवीन बाधीत रुग्ण आढळले आहेत.

सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्नात तब्बल 435 रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 6 हजार 113 तर, मृतांची संख्या 113 इतकी झाली आहे. ठाणो महानगर पालिका हद्दीत 338 बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 506 वर गेली आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 311 झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत 227 रु ग्णांची तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 175 तर, मृतांची संख्या 207 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्नात 119 बधीतांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 859 तर, मृतांची संख्या 102 वर पोहोचली. 

मीरा भाईंदरमध्ये 124 रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 175 तर दिवसभरात तीन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 142 इतकी झाली आहे. उल्हासनगर 137 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 766 तर एकाचा मृत्यु झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 42 झाली आहे. अंबरनाथमध्ये 88 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 769 तर दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 42 झाली आहे. बदलापूरमध्ये 21 रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर बाधितांची संख्या 742 झाली आहे. तर मृतांची संख्या 15 झाली आहे. तर, ठाणो ग्रामीण भागात 72 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 1493 तर तीघांचा मृत्यु झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 45 वर गेली आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona in Thane kills 34 people, including 1561 infected in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.