शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मीरा भाईंदर महापालिकेत अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना प्रवेश नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:13 IST

CoronaVirus News: मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्गाचा कहर उफाळून आला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

मीरारोड - कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मीरा भाईंदर महापालिका कार्यालयात केवळ अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . परंतु नगरसेवकां सोबत येणारे लोक तसेच राजकारणी, ठेकेदार आदींना पण प्रवेश बंदी असणार का? असा सवाल नागरिक करत आहेत. (CoronaVirus News: Citizens have no access to Mira Bhayander Municipal Corporation without essential work!)

मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्गाचा कहर उफाळून आला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यातूनच १५ एप्रिलपर्यंतच्या रात्रीच्या संचारबंदी अनुषंगाने महापालिकेच्या कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना प्रवेश बंद केला होता. परंतु अत्यावश्यक कामांसाठी व तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना सरसकट बंदी घातल्याने टीकेची झोड उठली. त्यातूनच आता पालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी पालिकेत प्रवेश देण्यास मोकळीक दिली आहे. ज्या विभागामध्ये अत्यावश्यक काम आहे, त्या विभाग प्रमुखाने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाकडे प्रवेश पासची व्यवस्था करायची आहे, असे परिपत्रक उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सर्व विभाग प्रमुखांसह पदाधिकारी आदींना पाठवले आहे. 

नागरिकांना अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त प्रवेश बंदी करताना पालिकेत नगरसेवक त्यांच्यासोबत अनेकांना घेऊन जातात. काही राजकीय नेते, पदाधिकारी सुद्धा बेधडक पालिका कार्यालयात तहान मांडतात. ठेकेदार तसेच स्वतःची व्यक्तिगत कामे नसताना पालिकेत फिरणारे दलाल प्रवृतीना रोखणार का? असा सवाल नागरिकां मधून केला जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस