शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक; राज्यभर घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 11:50 IST

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपचे घंटानादद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन

डोंबिवली: भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ कल्याण डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थान येथून करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात 70 ठिकाणी, तर संपूर्ण कोकण भागात 700 ठिकाणी हे आंदोलन दिवभरात होणार असल्याचे असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.भाजपच्या आंदोलनाला भाविकांनीही उपस्थिती लावल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले, जनतेची जी भावना आहे तीच भाजप मांडत असून लॉकडाऊन देशभर उठवलेले असताना राज्य सरकार मात्र निद्रिस्त असल्याचे सोंग घेत आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन असल्याचे ते म्हणाले.गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही. सगळ्यांनी निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच केला. रामनवमीला श्रीरामाचे मुखदर्शन नाही. हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणस्पर्शाला पारखे झालो. अंतर राखलं. महिलांनी वट पौर्णिमेचा व्रत घरातूनच जपलं. चातुर्मास सुरु झाला. आषाढी एकादशीला ठोबाच्या दर्शनाला आतुर झालो. अजून नको, अंतर राखा, म्हणून माऊलीला मनातूनच दंडवत घातला. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार राहूनच गेला. पवित्र श्रावण महिना आला आणि गेला. श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही. दहीहंडीच्या उत्सहाला मुरड घातली. गणपती बाप्पा आले. आता गौरी पूजनही संपन्न झाले. पण आता पुरे झाले. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. लवकरात लवकर देवालय सुरु करावी यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.त्यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते, गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी,  कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, सचिन कटके आदींसह कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.कल्याणमध्येही आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून वीस ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून त्याची सुरुवात सकाळी करण्यात आल्याचे पवार म्हणाले.भर पावसात आंदोलनकल्याण डोंबिवलीत शुक्रवारपासून पावसाची संतत धार सुरू असून शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. त्यातील लहान सर येताच भाजपने घंटानाद आंदोलन केले, गणपतीची आरती म्हंटली, आणि जिथं आंदोलन होतील तिथं कार्यकर्त्यांनी पावसाचा अंदाज घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आंदोलन करावी असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या