शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

CoronaVirus News : लसीकरणासाठी ८५० केंद्रांची सोय, टास्क फोर्सची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 00:17 IST

CoronaVirus News in Thane : लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा समावेश आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्रांची सोय केली असून, तेथे दर दिवशी १०० लस देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार, एका दिवशी आठ हजार ५०० जणांना लस देण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी सांगितले. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील या लसीकरणासाठी शीतसाखळी तयार केली असून, तीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार. यासाठी आइसलाइंड रेफ्रिजरेटर (आयएलआर) तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचे तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस एवढे असून, त्यात ती ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९० आयएलआर आहेत. लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा समावेश आहे. त्यासाठी लस उपलब्ध होताच, तातडीने मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीच्या आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, डॉ.विना जळगावकर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डीपफ्रीजरची व्यवस्थाजिल्ह्यातील ६६ हजार ४४७ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. कोरोनाची लस ठेवण्यासाठी जिल्ह्यात १९७ डीपफ्रीजरची व्यवस्था आहे, तसेच एकूण कोल्ड बॉक्स १९९ असून, २६ हजार ५३० आइस पॅक उपलब्ध आहेत. याबरोबरच जिल्ह्यात चार हजार ८१४ वॅक्सिन कॅरियर असणार आहेत, तर ८४६ वॅक्सिनेटर, ३४० पर्यवेक्षक तैनात आहेत.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस