शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

CoronaVirus News : कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 15:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते.

मीरारोड - कोरोना पॉझिटिव्ह आणि हृदयासंबंधी विकार असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या हृदयातून चक्क ७ सेंटिमीटरची गाठ काढण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली. कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. 

मुळची कोल्हापूरची असणारी योगिता पाटील हिचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी तिला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. श्वास घेता येत नसल्याने या महिलेला ऑक्सिजनची गरज पाहता कुटुंबियांनी तिला तातडीने मीरा रोड येथील सदर खासगी रूग्णालयात हलवले.

रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरँसिस सर्जन डॉ. उमेंद्र भालेराव म्हणाले की, “ज्या वेळी या महिलेला रूग्णालयात आणण्यात आले होते तेव्हा या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि पायाला सूज होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अशा स्थितीत डॉ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात ७ सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हृदयाव्दारे शरीरातील अन्य अवयवांना होणाऱ्या रक्तप्रवाहात अडचणी येत होत्या. फुफ्फुसाला योग्यपद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता. मायक्सोमा नावाचा हा हृदयाचा ट्यूमर होता. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो.” 

डॉ. भालेराव पुढे म्हणाले, “कोविड-१९ संसर्ग असल्याने या महिलेवर स्टिरॉइड्स आणि रेमडेसिवीरद्वारे उपचार करण्यात आले आणि जेव्हा कोविडचा संसर्ग बरा झाला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे २१ एप्रिल रोजी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत हृदय व फुफ्फुसासंबंधी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.”

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतthaneठाणेdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmira roadमीरा रोड