CoronaVirus News : ३० पोलिसांना कोरोनाची लागण, एकाच दिवसात १४ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 01:17 IST2020-06-24T01:17:03+5:302020-06-24T01:17:09+5:30
राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) नऊ जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या ३८० इतकी झाली आहे.

CoronaVirus News : ३० पोलिसांना कोरोनाची लागण, एकाच दिवसात १४ जणांना बाधा
ठाणे : पाच अधिकाऱ्यांसह ३० पोलिसांना ४८ तासांमध्ये कोरोनाची लागण झाली. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) नऊ जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या ३८० इतकी झाली आहे.
२० जून रोजी नारपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाला बाधा झाली. भिवंडीत एसआरपीएफच्या एका हवालदारासह तीन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. २१ जून रोजी चितळसर ठाण्याच्या उपनिरीक्षकासह दोघांना, तसेच डोंबिवलीचे जमादार, विठ्ठलवाडी आणि चितळसर येथील प्रत्येकी एका हवालदारालाही लागण झाली. मुख्यालय आणि राज्य राखीव दलाच्या एका पोलीस नाईकालाही बाधा झाली. नारपोली ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनाही रविवारी लागण झाली. २२ जून रोजी बदलापूर आणि मानपाडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका अधिकाºयाला, मुख्यालयातील तिघा कर्मचाºयांना, कापूरबावडीतील एकाला आणि एसआरपीएफच्या पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली.