Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:01 IST2020-06-07T23:58:10+5:302020-06-08T00:01:08+5:30
एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. रविवारी दिवसभरात एका महिलेसह तिघांचा मृत्यु झाला.

मृतांमध्ये एका महिलेचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात १३८ कोरोनाच्या नविन रुग्णांची भर पडली असून ही संख्या दोन हजार ९८ च्या घरात पोहचली आहे. एका महिलेसह तिघांचा दिवसभरात मृत्यु झाला असून ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्या सुमारे ५४ टक्के म्हणजे एक हजार ८४३ इतकी नोंद झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणा-या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. शनिवारी २५ हजार १६१ रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी २४ हजार ९६३ अहवाल प्राप्त झाले. रविवारी १३८ नविन रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ९८ इतकी झाली आहे. तर दोन पुरुष आणि एका महिलेच्या मृत्युमुळे मृतांची संख्या ११६ झाली आहे. आतापर्यंत ३९ महिला आणि ७७ पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे.