CoronaVirus News: ठाणे महापालिका हद्दीत 127 मायक्रो कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:05 IST2021-04-07T00:04:50+5:302021-04-07T00:05:10+5:30
काेराेनासंबंधी उपाययाेजना : माजिवडा-मानपाडा समितीत सर्वाधिक

CoronaVirus News: ठाणे महापालिका हद्दीत 127 मायक्रो कंटेन्मेंट झोन
ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठामपाने मागील महिन्यापासून मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आता या झोनमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आहेत. विशेष म्हणजे, याच भागात मागील महिन्यापासून सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या या भागात एक हजार २४० सक्रिय रुग्ण असून शहरात १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन असून, त्यातील ४९ झोन हे केवळ माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आहेत.
ठामपा हद्दीत आतापर्यंत ८५ हजार ४०६ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ७१ हजार ६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, हे प्रमाण ८४ टक्के आहे. तर, एक हजार ४१३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या शहरात १२ हजार ३१४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण घरीच, तर उर्वरित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात सध्या दररोज १५००च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही रोजच्या रोज एकट्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत ५००च्या आसपास रुग्ण आढळत आहेत.
पाचपेक्षा जास्त रुग्णांचा निकष
कोरोनाच्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. या इमारती व परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही उपाययोजना केली जात आहे.
मायक्रो कंटेन्मेंट झोनवर दृष्टिक्षेप
प्रभाग समिती मायक्रो रुग्णसंख्या
कंटेन्मेंट झोन
माजिवाडा-मानपाडा ४९ १२४०
उथळसर १४ १२४
दिवा ४ ३५
नौपाडा-कोपरी २२ ६५
वागळे इस्टेट ४ ३१
कळवा ३ —
लोकमान्य-सावरकर ११ १४३
वर्तकनगर २० ७७८
मुंब्रा — —
एकूण १२७ २४३४