CoronaVirus News: उल्हासनगरात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १६२९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 21:13 IST2020-06-28T21:13:06+5:302020-06-28T21:13:14+5:30

उल्हासनगरात रविवारी तब्बल १०१ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १६२९ झाली.

CoronaVirus News: 101 new corona patients in Ulhasnagar today; The number of coronaries reached 1629 | CoronaVirus News: उल्हासनगरात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १६२९

CoronaVirus News: उल्हासनगरात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १६२९

उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे १०१ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या १६२९ झाली आहे. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत ९३३ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर ६५४ जनावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली. 

उल्हासनगरात रविवारी तब्बल १०१ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १६२९ झाली. त्यापैकी आज पर्यंत ९३३ जण कोरोना मुक्त झाले. तर ६५४ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन जणाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ४२ झाली. शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - १५, कॅम्प नं-२ मध्ये -१२, कॅम्प नं -३ मध्ये -३१, कॅम्प नं -४ मध्ये -३० तर कॅम्प नं -५ मध्ये १३ असे एकूण १०१ नवे रुग्ण आढळून आले. शहरातील झोपडपट्टी भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील कोविड रुग्णालयाची पाहणी केली असून उपाययोजना करण्याचे संकेत दिले

Web Title: CoronaVirus News: 101 new corona patients in Ulhasnagar today; The number of coronaries reached 1629