CoronaVirus News: अब्दुल कलाम स्टेडियममध्ये म्हाडा तयार करणार १००० बेड्सचे कोरोना हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 19:54 IST2020-05-29T19:54:33+5:302020-05-29T19:54:51+5:30
पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, आयुक्तांनी केली पाहणी

CoronaVirus News: अब्दुल कलाम स्टेडियममध्ये म्हाडा तयार करणार १००० बेड्सचे कोरोना हॉस्पिटल
ठाणे : मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हिड हॅास्पीटल उभारण्यात येणार असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.
भविष्यात कोरोना १९ रूग्णांना बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी शहरामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआरडीएच्यावतीने 1000 बेडसचे कोव्हीड 19 रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ते रूग्णालय कार्यान्वित होणार आहे.
तथापि भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत महानगरपालिकेच्या कौसा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने 1000 बेडसचे कोव्हिड रूग्णालय म्हाडाच्यावतीने उभे करण्यात येत आहे. यामध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेडस् निर्माण करण्यात येणार आहेत. तर 100 बेड्सचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे.