शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

CoronaVirus News: स्मशानभूमींना कोरोनाचा विळखा; जवाहरबाग स्मशानभूमीतील दोघांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:42 IST

प्रत्येक कर्मचाऱ्याची मोफत चाचणी करण्यासाठी आयुक्तांना साकडे

ठाणे : ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब शनिवारी उघड झाली. त्यामुळे या कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागत आहे. त्यांचे पीपीई किट तकलादू असून हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. त्यामुळे ठाण्यातील सर्वच स्मशानभूमींतील कर्मचाºयांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.ठाणे शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जवाहरबाग स्मशानभूमीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांपैकी ८० टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. या ठिकाणच्या कर्मचाºयांनाच या कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातूनच, आता येथील एका चालकासह अन्य एका कर्मचाºयाला शनिवारी कोरोनाची लागण झाल्याची बाब स्पष्ट झाली. याठिकाणी काम करणाºया कर्मचाºयाला त्रास होत असल्यामुळे त्याने दोन दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागते. त्यांना दिलेल्या पीपीई किट तकलादू आहेत.हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. सॅनिटायझर आणि साबणही त्यांना अपुºया प्रमाणात पुरविले जातात. कोरोनाग्रस्त कर्मचाºयांचे वेतनही ठेकेदाराकडून कपात केले जात आहे. या सर्वच कर्मचाºयांचे वेतन वेळेत आणि विनाकपात दिले जावे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेण्याच्या कालावधीमध्येही त्याला भरपगारी वैद्यकीय सुटी दिली जावी, अशी मागणीही या कर्मचाºयांकडून केली जात आहे.जवाहरबाग स्मशानभूमीत कर्मचाºयांना दिलेल्या किटचा एका बाजूला ढिगारा पडलेला आहे. मागील दीड महिन्यापासून हा ढिगारा उचलला गेलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणाºया पावसामुळे आणखी कोणाला बाधा झाली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतील कर्मचाºयांची दर १५ दिवसांनी बदली केली जाते. परंतु, त्याचेही दुष्परिणाम होण्याची भीती आहे. बाधा झाल्याचे एखाद्याच्या लक्षातच आले नाही, त्याची अन्यत्र बदली झाल्यानंतर तो इतरांच्या संपर्कात आला, तर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ शकतो, याकडेही काही कर्मचाºयांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोपठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष तथा ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून येथील कंत्राटी कर्मचाºयांना सुरक्षेचे कवच द्यावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.कर्मचाºयांना तत्काळ सुरक्षा साहित्य देण्याची मागणीशहरातील प्रत्येक स्मशानभूमीमधील कर्मचाºयांची कोरोनाची तत्काळ मोफत चाचणी करावी. त्यांना हॅण्डग्लोव्हज, मास्क, किट आणि इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी उल्हासनगर येथील रहिवाशांनीही केल्या होत्या. त्यामुळे स्मशानभूमीतील धूर बाहेर फेकणाºया चिमण्या मोठ्या प्रमाणात असाव्यात, अशीही मागणी या पार्श्वभूमीवर होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या