शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

LockdownNews : ठाणे शहरातील लॉकडाऊन वाढला, फक्त अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 17:32 IST

यापूर्वी हा लोकडाऊन 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंतच होता. मात्र रोजच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ बघता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे: अत्यावश्यक सेवा तसेच किराणा, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा वगळता ठाणे महानगरपालिका क्षेत्रत पुन्हा 12 ते 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रंनी दिली.

ठाणे शहरात तसेच जिल्ह्यातील बहुतांश भागात यापूर्वीच 2 जुलै रोजी सकाळी 7 ते 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. शहरात सध्या 392 कंटेनमेंट झोन असून रुग्णांची संख्याही गुणाकार पद्धतीने वाढली आहे. बुधवारी 296 रुग्ण शहरात आढळले होते. तर गुरुवारी यामध्ये तब्बल 348 ने वाढ झाली. गुरुवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 12 हजारांच्या घरात गेली असून मृतांची संख्याही 465च्या घरात गेली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रतील 12 जुलैपर्यंतचा लॉकडाऊन कालावधी 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे महापालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

यात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना तसेच अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा राहणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘‘कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक होता. सुरुवातीला तो दहा दिवसांचा केला होता. यात आता आठ दिवसांची वाढ केली आहे. यातून घरकाम करणाऱ्या कामगारांना मात्र वगळण्यात आले आहे. यामध्ये किराणा आणि भाजीपाला हे संबंधित कंटेनमेंट झोननुसार काही काळासाठी सुरू राहणार आहेत,’’ असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटले आहे. 

बरे झालेले रुग्ण अधिक -ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ या शहरांत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, जि.प. सदस्य, अनेक नगरसेवकांसह पत्रकार, विविध कर्मचारी, पोलिसांसह बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एसटी कर्मचाऱ्यांनाही ड्युटी करताना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुसंख्य लोकांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेMumbaiमुंबई