शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

coronavirus: भाईंदरमधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:10 IST

मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले .

मीरारोड - महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवत मीरा भाईंदर मधील अन्य भागात मात्र सम विषम पद्धतीने दुकाने, व्यवसाय उघडण्यास परवानगी दिली आहे . परंतु लॉकडाऊन शिथिल होताच बेजबाबदार लोकांनी खरेदीसाठी गर्दी करून सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊन हटवण्यावरून राजकीय इशारेबाजी करणारे राजकारणी व नगरसेवक कुठे लपले ? असे सवाल जागरूक नागरिक करत आहेत . 

मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . त्यामुळे आयुक्तांनी 1 ते 10 जुलै दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केले . ठाणे , कल्याण आदी जिल्ह्यातील अन्य महापालिकांनी लॉकडाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले . 

एकीकडे लॉकडाऊन वाढवले असताना दुसरी कडे मास्क न घालता नाहक फिरणारे , शहरात भाजी - मासळी खरेदीसाठी गर्दी , बेकायदा फेरीवाले व चोरून दुकाने उघडणारे तसेच व्यायामाच्या नावाने बाहेर गर्दी करणारे सतत दिसून आल्याने लॉकडाऊन बाबत प्रशासनासह राजकारणी , नगरसेवक देखील दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले . 

एकीकडे लॉकडाऊन आणि सुरक्षेच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे या बाबत मूग गिळून गप्प बसणाऱ्या बहुतांश नगरसेवक , राजकारण्यांनी दुसरीकडे लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलन करू असे इशारे देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरु केले . त्यामुळे आयुक्त लॉकडाऊन बाबत काय भूमिका घेतात या कडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते . 

परंतु आयुक्तांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे . या 10 हॉटस्पॉट मध्ये भाईंदरचे सरस्वती नगर , साईबाबा नगर , गोडदेव नाका - बाळाराम पाटील मार्ग परिसर , सेना नगर गोडदेव गाव परिसर , खारीगाव - बाळाराम पाटील मार्ग परिसर, शिर्डी नगर , आर एन पी पार्क , मुर्धा रेव आगर , राई शिवनेरी गल्ली 23, पाली सुंदर गल्ली पेट्रोल पंप चौक  या परिसराचा समावेश आहे . 

या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा यासाठी पोलीस व पालिका प्रशासन भर देणार आहे . परंतु त्याच बरोबर लॉकडाऊन शिथिल केलेल्या मीरा भाईंदर मधील बहुतांश भागात देखील सुरक्षा निर्देशांची काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आली आहे .

आयुक्तांनी जरी केलेल्या आदेशात मॉल, मार्केट , शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहे . तर बाजारपेठ , भाजी मार्केट , दुकाने हि सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सम - विषम तत्वावर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . या शिवाय शासनाच्या पुनश्च हरिओम अभियान अंतर्गत व्यवसाय , कारखाने सुद्धा ठरवून दिलेल्या निर्देशा प्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक