शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
3
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
4
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
5
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
6
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
7
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
8
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
9
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
10
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
11
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
12
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
13
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
14
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
15
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
16
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
17
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
18
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
19
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
20
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कबरस्तान ‘लॉकडाऊन’ होण्याची भीती; मृतांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 00:55 IST

मुंब्य्रात दफनविधीसाठी मोजकीच जागा शिल्लक

- कुमार बडदे मुंब्रा : तीन महिन्यांमध्ये मुस्लिमबहुल मुंब्य््राात मुस्लिम नागरिकांच्या मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कबरस्तानमधील मृतदेह दफन करण्याची जागा वेगाने कमी होत आहे. जागेअभावी येथील तीनपैकी एक कबरस्तान पुढील काही दिवसांमध्ये लॉकडाऊन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कौसा गाव, एमएम व्हॅली तसेच अमृतनगर भागातील फकरुद्दीन शहा बाबा दर्ग्याजवळ कबरस्तान आहेत. यातील पावणेदोन एकर भूखंडावरील दर्गा कबरस्तानमध्ये १६00 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. यामध्ये २00 मृतदेह लहान मुलांचे आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कबरस्तानमध्ये महिन्याकाठी सरासरी ५0 ते ६0 मृतदेह दफन करण्यासाठी येत होते. परंतु, त्यामध्ये अचानक वाढ होऊन मार्च महिन्यात ७५, एप्रिल महिन्यात ९१, मेमध्ये १६0 आणि १ ते १५ जूनदरम्यान १२५ मृतदेह या कबरस्तानमध्ये दफन करण्यात आले. त्यामुळे सध्या येथे आणखी अंदाजे ८0 मृतदेह दफन करण्याची जागा उरली आहे. यानंतर, येथे जागाच शिल्लक राहणार नसल्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी कबरस्तान बंद करावे लागू शकते, अशी माहिती कबरस्तान कमिटीचे चेअरमन हानीफ शेख यांनी दिली.मुंब्य्रातील एमएम व्हॅलीजवळील कबरस्तानमध्ये सध्या दररोज जवळपास २२ ते २५ मृतदेह दफन करण्यासाठी येत आहेत. पूर्वी ही संख्या फक्त दोन ते तीन होती. येथे मृतदेह येण्याचे प्रमाण वाढले असले, तरी दफनविधीसाठी अद्यापही मुबलक जागा शिल्लक असल्याची माहिती या कबरस्तान कमिटीचे सचिव लियाकत ढोले यांनी दिली.कौसा भागातील स्थानिक नागरिकांसाठी असलेल्या कौसा कबरस्तानमध्येही सध्या दररोज दोन ते तीन मृतदेह दफन करण्यासाठी येत असल्याचे ढोले यांनी सांगितले. दरम्यान, सुरुवातीच्या काळात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे ते औषधोपचारासाठीही रुग्णालयात जाण्याचे प्रकर्षाने टाळत होते.काहींना विविध कारणांमुळे वेळीच उपचार मिळाले नाही. या आणि इतर काही कारणांमुळे मागील काही महिन्यांत येथील मृत्युदर वाढला असावा, असे मुंब्रा डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोईनुद्दीन राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या