भिवंडीतील चिंबीपाडा आश्रमशाळेतील १८ विध्यार्थीसह २ कर्मचाऱ्यांसह २० जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:58 IST2022-01-03T19:57:57+5:302022-01-03T19:58:20+5:30
भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील १८ विध्यार्थी तसेच २ कर्मचाऱ्यांचे अहवाल पोसिटिव्ह आल्याने आश्रमशाळेसह तालुका आरोग्य विभागात एकच खळबळ

भिवंडीतील चिंबीपाडा आश्रमशाळेतील १८ विध्यार्थीसह २ कर्मचाऱ्यांसह २० जणांना कोरोनाची लागण
नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ३ ) भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील १८ विध्यार्थी तसेच २ कर्मचाऱ्यांचे अहवाल पोसिटिव्ह आल्याने आश्रमशाळेसह तालुका आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बाधित रुग्णांना उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
या आश्रमशाळेत सुमारे ४७० विद्यार्थी असून या सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात अली असून २० जणांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत सोमवारी एकच गर्दी केली होती.
दरम्यान अजूनही विध्यार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू असून अहवाल येणे बाकी असल्याने बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती प्र.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. डावकर यांनी दिली आहे.