coronavirus: आयसीयूचे २४ बेडच कार्यान्वित, ग्लोबल हॉस्पिटलसंदर्भात आयुक्तांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:33 AM2020-07-10T01:33:24+5:302020-07-10T01:33:34+5:30

‘ग्लोबल’च्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर होते. मात्र, एकाची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर, अन्य एकाला कोरोना झाला. त्यामुळे क्वारंटाइन होणे आवश्यक असल्याने तेथे डॉक्टरची कमतरता असल्याचे ते म्हणाले.

coronavirus: ICU's only 24 beds operational, Commissioner admits regarding global hospital | coronavirus: आयसीयूचे २४ बेडच कार्यान्वित, ग्लोबल हॉस्पिटलसंदर्भात आयुक्तांची कबुली

coronavirus: आयसीयूचे २४ बेडच कार्यान्वित, ग्लोबल हॉस्पिटलसंदर्भात आयुक्तांची कबुली

Next

ठाणे : ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून, यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबुली ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी दिली. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून भरती प्रक्रियादेखील निरंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ग्लोबल’च्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर होते. मात्र, एकाची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर, अन्य एकाला कोरोना झाला. त्यामुळे क्वारंटाइन होणे आवश्यक असल्याने तेथे डॉक्टरची कमतरता असल्याचे ते म्हणाले. २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून भरती प्रक्रि या ही एकदा झाली असली तरी ती पुन्हा होणार आहे.

रु ग्णांच्या होणार तीन प्रकारच्या नोंदी
ग्लोबल हॉस्पिटलसारखा प्रकार यापुढे न होण्यासाठी रु ग्णाला दाखल करतानाच आता तीन प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेऊन त्याची नोंद केली जाईल. त्यानंतर रु ग्णाचे छायाचित्र घेऊन तेही त्याच्या फाइलला लावले जाणार आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनाही विश्वासात घेतले जाणार आहे.

केडीएमसी हद्दीत कोरोनाचे ५८० रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १६४ झाली आहे. दुसरीकडे नवीन ५८० रुग्ण आढळले असून, ही मनपा हद्दीतील आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १० हजार ९३१ झाली आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २१९ आहे. दरम्यान, दिवसभरात ६०२ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या पाच हजार ५४८ आहे.

‘त्या’ दोन्ही कुटुंबांना मिळणार योग्य मृत्यू दाखला
गायकवाड आणि सोनावणे यांच्या अदलाबदल प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घातले असून दोन्ही कुटुंबीयांना योग्य मृत्यूचा दाखला दिला जाणार आहे. तशी कार्यवाही सुरू केल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

शहापूरमध्ये २८ रुग्ण सापडले
शहापूर : तालुक्यात गुरुवारी एकाच दिवशी २८ रुग्ण सापडले. शहापूर नगरपंचायत क्षेत्रात पाच तर शहापूर ग्रामीण क्षेत्रात २३ रुग्ण सापडले. आतापर्यंत तालुक्यात एकूण ३८३ कोरोनाबधितांची संख्या झाली आहे. आतापर्यंत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून २२४ जण बरे झाले आहेत. एकूण १४६ जणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरीही रु ग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोविड रुग्णालयही भरले असल्याने नव्या रु ग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना रुग्ण वेटिंगवर
उल्हासनगर : शहरात बेड नसल्याने कोरोना रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबे आणि इतरांना क्वारंटाइन करण्यास दिरंगाई होत आहे.
कोविड रुग्णालय भरल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेटिंगवर ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांना विचारले असता माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी संपर्कझाला नाही. सरकारी प्रसूतिगृह, विमा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आयटीआय कॉलेजचे रु पांतर कोविड रु ग्णालयात केले. तर, रेडक्र ॉस रु ग्णालय संशयित रुग्णांसाठी आरक्षित आहे. मात्र, या सर्व रुग्णालयांची क्षमता केव्हाच संपलेली आहे. दरम्यान, मनपाने तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. तसेच डॉ. आंबेडकर अभ्यासिकेशेजारील शाळेतही रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेथील कामे पूर्ण झालेली नाहीत.

 

Web Title: coronavirus: ICU's only 24 beds operational, Commissioner admits regarding global hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.