Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:28 PM2021-05-08T18:28:55+5:302021-05-08T18:29:48+5:30

Coronavirus in Thane : कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे.

Coronavirus: Fund of Rs 2.5 crore Rupees from MP Kumar Ketkar for ten hospitals in Thane district | Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा निधी

Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा निधी

Next

ठाणे - येथील सिव्हिलसह जिल्ह्यातील ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालये आदी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयी, सुविधांची गरज आहे. (Coronavirus in Thane) याकडे लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील तब्बल दहा रुग्णालयांच्या सोयी, सुविधा, वैद्यकीय साहित्यांसाठी जेष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar )  यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसे लेखी पत्रच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शुक्रवारी दिले. (Fund of Rs 2.5 crore from MP Kumar Ketkar for ten hospitals in Thane district)

ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयी, सुविधांची वानवा आहे. रुग्णालयाच्या या गरजां येथील संदीप आचार्य व विकास नाईक यांनी केतकर यांच्या निदर्शनात आणून दिला होत्या. कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. याप्रमाणे अन्यही लोकप्रतिनिधींनी रुग्णालयांच्या कामांसाठी निधी देण्याची गरज असल्याचे खा. केतकर, यांनी या अर्थ सहाय्यातून उघड केले आहे. या निधीचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देते वेळी दालना ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार उपस्थित होते.

अवघ्या‌ २५ लाखांचा निधी देण्याची तयारी खा. केतकर यांनी प्रारंभी दर्शवली होती. मात्र डॉ. पवार यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव तयार केले आणि त्याकडे खा. केतकर, यांचे लक्ष वेधले असता त्यांनी अडीच कोटींचा निधी देण्याची सहमती दर्शवत तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे केतकर हे एकमेव खासदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. अन्य खासदारांनीही आपला निधी करोनाच्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी म्हणून दिला, तर राज्यातील शासनाच्या अनेक रुग्णालयांना मोठी मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Coronavirus: Fund of Rs 2.5 crore Rupees from MP Kumar Ketkar for ten hospitals in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.