भिवंडी : कोरोना व्हायरसबाबत शासनातर्फे जनजागृती करून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीत डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम मास्क घालून पार पाडण्यात आला.पूनम मोनिश गायकवाड (रा. मीठपाडा) या विवाहितेचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होता.त्यासाठी घरी पाहुणे मंडळी आली होती. सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीने लोक घराबाहेर पडण्यास नकार देत असल्याने पाहुण्यांना कोरोनाची भीती वाटू नये, यासाठी पूनम यांनी स्वत: चेहऱ्याला मास्क लावून सर्वांना मास्क देत न घाबरत योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्याला प्रतिसादही मिळाला.
Coronavirus : भिवंडीत मास्क लावून डोहाळे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:28 IST