शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बदलापूर शहरातील कडक लॉकडाऊनला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 22:54 IST

Coronavirus News : आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बदलापूर: राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन आणखीन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे . पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे राज्य शासन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉक डाऊन मध्ये शिथीलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे. तर दुसरीकडे बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत.  शनिवारपासून पुढचे सात दिवस शहरात कडक लॉकडावून जाहीर करीत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कडक लॉक डाऊन मध्ये मेडिकल स्टोअर आणि दवाखाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली असून आता शनिवारी सलग सात दिवस बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूर