coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:40 AM2020-03-26T11:40:36+5:302020-03-26T11:44:14+5:30

कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करून कंन्टेनमेंट प्लॅन प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर भागामध्ये १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

coronavirus: discharge to Two person after test report came in negative | coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले

coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले

Next

कल्याण-  सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका नागरी आरोग्य केंद्रामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.महापालिका क्षेत्रात अद्यापपर्यन्त कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दाखल रुग्णापैकी २ रुग्णाची तपासणीमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले, त्यामध्ये कल्याण मधील ३ वर्षीय बालिकेचा समावेश आहें.

कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करून कंन्टेनमेंट प्लॅन प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर भागामध्ये १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात आरोग्य पथके स्थापन केली असून त्यात पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. सदर पथक परदेश्यातून आलेल्या नागरिकांना भेटी देउन  त्यांच्या स्वतः च्या  घरी अलगिकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये सहकार्य न करणाऱ्या नागरिकांवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेश्यातून परत आलेल्या   नागरिकांना अलगिकरणात राहण्याच्या सल्ला दिलेला आहे. त्यांना नागरी आरोग्य केंद्रामार्फत भेटी देऊन दिलेल्या सूचनां ते पाळत असल्याची खातरजमा केली जात आहे. दि.२२/०३/२०२० पासून अशा नागरिकांच्या डाव्या हाताच्या पंज्यावर मागील बाजूस शिक्का मारून त्यांनी किती तारखेपर्यंत अलगिकरणात राहायचे आहे हे नमूद केलेले आहे.

महापालिकेच्या वसंत व्हली, मोजे गंधारे,कल्याण (प) येथे क्वारंटाईन वॉर्डमध्ये ९ परदेश्यातून आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांची सर्व व्यवस्था महापालिकेमार्फत  करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयाना विलगीकरण कक्ष तयार करून व्हेंटिलेटरसहित सुसज्ज ठेवण्याचे  आदेश दिलेले आहेत.50 खा टाच्या  रुग्णालयात 10 खा टा चा विलगिकर ण  कक्ष स्थापन करणेबाबत निर्देशित केले आहे.

कल्याण  डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मध्य रेल्वेच्या रुग्णालयात १२  खाटांचे व महापालिकेच्या बाई रुक्मिणी बाई रुग्णालय आणि शास्त्रीनगर रुग्णालय येथे प्रत्येकी ५ खाटांचे विलगीकरण कक्ष तयार आहे.  महापालिकेच्या रुग्णालय व दवाखाने येथे IMA ,NIMA आणि कल्याण पूर्व मेडिकल आसोशिएशन यांचे मार्फत ७५ खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सेवा देण्यास तयार आहे.त्यापैकी काही ओ पी डी साठी सेवा देत आहेत. महापालिकेतर्फे कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी  वॉर रूम स्थापन करण्यात आली असून या वॉर रूम मार्फत(संपर्क क्र.०२५१  २२११३७३)सर्व विभागाच्या समन्वयातून आपत्ती व्यवस्थापनाची कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: coronavirus: discharge to Two person after test report came in negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.