Coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट; ३१०२ रुग्णांच्या वाढीस ५८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 21:42 IST2021-04-26T21:41:28+5:302021-04-26T21:42:06+5:30
ठाणे शहर परिसरात ६९८ रुग्ण सापडल्याने या शहरात आजपर्यंत एक लाख १५ हजार ६२९ रुग्ण नोंद झाली आहे

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट; ३१०२ रुग्णांच्या वाढीस ५८ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सोमवारी घटली आहे. तब्बल दोन हजार रुग्ण घटले. आज गेल्या २४ तासात तीन हजार १०२ रुग्ण जिल्ह्यात आढळले. मृतांच्या संख्येत मात्र वाढ होऊन आज ५८ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात आता चार लाख ५३ हजार ६८९ रुग्ण झाले असून सात हजार ३३६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरात ६९८ रुग्ण सापडल्याने या शहरात आजपर्यंत एक लाख १५ हजार ६२९ रुग्ण नोंद झाली आहे. आज आठ मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ६२१ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८५४ रुग्ण आढळून आले असून नऊ जणांचे निधन झाले आहे. या शहरात आता एक लाख १७ हजार २३० बाधीत असून एक हजार ३९४ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरला ८४ रुग्ण आढळले असून तीन मृत्यू आहे. आता या शहरात १८ हजार ३७० बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१४ झाली आहे. भिवंडीला ५२ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे नऊ हजार ७१९ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ४१९ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता ४१ हजार ७९३ बाधितांसह ९९२ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथ शहरात १११ रुग्ण सापडले असून पाच मृत्यू आहे. या शहरात आता १७.हजार २३३ बाधितांसह मृतांची संख्या ३६१ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये २०५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १७ हजार ९३५ झाले असून ११ मृत्यू आहे. आता मृत्यूची संख्या १६९ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये २२४ रुग्णांचा शोध घेण्यात आला असून चार मृत्यू झाले. या गांवपाड्यांत २५ हजार ४९२ बाधीत झाले असून ६६६ जणांचा मृत्यू झालेला आहे.