Coronavirus: कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार; मैदानात न उतरता खेळाडूंचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:30 IST2020-05-04T00:29:57+5:302020-05-04T00:30:16+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जाणारे क्रीडा प्रकार आणि ‘अ’ दर्जाचे खेळ यासाठी हे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत

Coronavirus: कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार; मैदानात न उतरता खेळाडूंचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : सध्या लॉकडाउनमुळे सर्वच ठप्प झाले आहे. खेळाडूंनाही प्रत्यक्ष मैदानावर उतरून सराव करता येत नाही. त्यामुळे अनेक खेळांडू घरात बसून खेळाचे आॅनलाइन प्रशिक्षण घेऊ न तयारी करत आहेत. असे असले तरी खेळाडूंसाठी मैदानावरील सराव महत्त्वाचा असून, तो बंद असल्यामुहे यंदा शालेय तसेच इतर सर्वच क्रीडास्पर्धा रद्द होण्याची शक्यता क्रीडा शिक्षक लीना मॅथ्यू यांनी व्यक्त
केले.
ज्युदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि साई म्हणजेच भारतीय खेळ प्राधिकरण (स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या खेळातील खेळाडूंना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी कशी करायची, एखाद्या आॅलिम्पियन खेळाडूने कशी तयारी केली, या सगळ्याचे मार्गदर्शन केले जात आहे. काही नियम बदलले असतील तर त्याविषयी माहिती दिली जात आहे. २० दिवसांपासून हे आॅनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.
दरवर्षी शालेय पातळी ते विद्यापीठ पातळीपर्यंत क्रीडा स्पर्धा होतात. जुलै आणि आॅगस्टपासून जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धांना सुरुवात होते. कोरोनामुळे या स्पर्धा होणार की नाही याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. शासनाच्या स्पर्धासाठीचे पत्र स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाकडून काढले जाते. त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय काम करते. खाजगी असोसिएशनच्या स्पर्धांचे नियमन भारतीय आॅलिम्पिक संघटना करत असते. लॉकडाऊन संपला तरी काळजी घ्यावी लागणार असल्याने या स्पर्धा लगेच घेण्यात येणार नाहीत. खेळाडूंचा एकत्र सराव होत नसल्याने घरी ते फिटनेससाठी जो काही व्यायाम करतात तेवढाच. कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धांबाबत अनिश्चितता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
व्हिडीओद्वारे सरावाच्या सूचना
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जाणारे क्रीडा प्रकार आणि ‘अ’ दर्जाचे खेळ यासाठी हे आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. काही कोच खेळाडूंना तंत्र सांगतात. त्यांचा व्हिडीओ मागवून घेतात. व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे खेळाडूंना सराव करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.