शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

coronavirus: ठाण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचा आलेख लॉकडाऊनमध्येही चढताच, रुग्णसंख्येतही फारशी घट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:35 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पर्यायाने मृत्यू वाढत असल्याने कडक लॉकडाऊन पुन्हा लागू केला गेला. आता त्याला आठवडाभराची मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जराही कमी झालेला नाही. रुग्णसंख्येतील घट फारच मामुली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नव्हे तर सक्षम वैद्यकीय व्यवस्था उभी करणे, हाच मृत्युदर कमी करण्याचा मार्ग असू शकतो. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन टोकलिझुमॅब व रेमडेसिविर हीच उपलब्ध नसतील, तर रुग्णांचे मृत्यू कसे रोखले जाणार, असा सवाल लॉकडाऊनच्या फार्समुळे संतापलेले ठाणेकर करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.त्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णसंख्या व मृत्यूंशी दि. ३ ते ९ जुलैदरम्यान लॉकडाऊनच्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूंशी तुलना केली असता लॉकडाऊन सपशेल निरर्थक ठरला आहे.१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णसंख्या व मृत्यू असेठाणे : (३६६/१४), कल्याण-डोंबिवली : (३५०/३), अंबरनाथ : (४५/६), बदलापूर : (३३/०), भिवंडी : (८२/३), उल्हासनगर : (६८/०), मीरा रोड-भाईंदर : (११२/०), नवी मुंबई : (२१८/६), ठाणे ग्रामीण : (५१/१)३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांत लॉकडाऊन लागू झाला. त्या दिवसापासून दररोजची रुग्णसंख्या व मृत्यू याची तुलना अशी :दि. ३ जुलै : ठाणे : (४२०/१७), कल्याण-डोंबिवली : (५६४/३), अंबरनाथ : (१०१/५), बदलापूर : (४८/०), भिवंडी : (६३/४), उल्हासनगर : (१९१/२), मीरा रोड-भाईंदर : (२७६/३), नवी मुंबई : (२५७/८), ठाणे ग्रामीण : (१०८/४)दि. ४ जुलै : ठाणे : (४०८/१७), कल्याण-डोंबिवली : (५५५/५), अंबरनाथ : (९४/१), बदलापूर : (४६/१), भिवंडी : (७७/१), उल्हासनगर : (२१२/३), मीरा रोड-भाईंदर : (१२६/६), नवी मुंबई : (१५७/७), ठाणे ग्रामीण : (१७३/४)दि. ५ जुलै : ठाणे : (३७३/१६), कल्याण-डोंबिवली : (४८२/५), अंबरनाथ : (७४/१२), बदलापूर : (२१/०), भिवंडी : (६९/१), उल्हासनगर : (२५१/१), मीरा रोड-भाईंदर : (३०३/४), नवी मुंबई : (१९१/५), ठाणे ग्रामीण : (११२/३)दि. ६ जुलै : ठाणे : (२६८/१४), कल्याण-डोंबिवली : (४१३/४), अंबरनाथ : (५६/५), बदलापूर : (३८/१), भिवंडी : (८८/०), उल्हासनगर : (१५९/३), मीरा रोड-भाईंदर : (१५७/४), नवी मुंबई : (१६४/८), ठाणे ग्रामीण : (१६७/०)दि. ७ जुलै : ठाणे : (२९६/१६), कल्याण-डोंबिवली : (३८१/७), अंबरनाथ : (५१/३), बदलापूर : (६२/१), भिवंडी : (३०/०), उल्हासनगर : (११९/१), मीरा रोड-भाईंदर : (१६१/४), नवी मुंबई : (११५/८), ठाणे ग्रामीण : (१२४/५)दि. ८ जुलै : ठाणे : (४१०/१७), कल्याण-डोंबिवली : (४७१/७), अंबरनाथ : (७५/४), बदलापूर : (८५/१), भिवंडी : (९५/६), उल्हासनगर : (१७२/०), मीरा रोड-भाईंदर : (१७५/४), नवी मुंबई : (२०७/९), ठाणे ग्रामीण : (१०७/३)09 जुलैठाणे : (३४८/१६), कल्याण-डोंबिवली : (५८०/६), अंबरनाथ : (५०/२), बदलापूर : (३६/१), भिवंडी : (५१/८), उल्हासनगर : (१६४/३), मीरा रोड-भाईंदर : (१८५/२), नवी मुंबई : (२३९/९), ठाणे ग्रामीण : (१४०/३)आकडेवारी पाहिली तर ठाणे शहरात दररोज साधारण १४ ते १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज साधारण होणारे मृत्यू लॉकडाऊन काळात वाढले आहेत. साधारण सात व्यक्ती रोज मरण पावत आहेत.अंबरनाथ-बदलापूरमधील मृत्युसंख्येत फार फरक पडलेला नाही. भिवंडीतील मृत्यू वाढले आहेत. उल्हासनगर, मीरा-भार्इंदरच्या मृत्यूमध्ये फार फरक पडलेला नाही. दररोज ३ ते ७ व्यक्ती या दोन्ही शहरांत मरण पावत आहेत.नवी मुंबईतही दररोज सात ते नऊ व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. तीच गत ठाणे ग्रामीणची असून तेथेही दररोज तीन ते पाच व्यक्ती दगावत आहेत. केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मृत्यू रोखण्यास सांगितले होते. लॉकडाऊनमुळे त्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे