शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे कोसळणार आर्थिक डोलारा, ठाणे महानगरपालिकेची एप्रिल महिन्यात शून्य वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 04:23 IST

आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे.

- अजित मांडके ठाणे : लॉकडाउनमुळे नागरिकांच्या उत्पन्नावर जसा परिणाम झाला आहे, तसाच तो ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेस मागील वर्षी एप्रिल महिन्यात २८.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत इतिहासात प्रथमच शून्य उत्पन्न आले आहे. काही महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला, तर आर्थिक स्रोत आटून महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती आहे.आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच मागील काही वर्षांत घेतलेल्या खर्चिक प्रकल्पांमुळे महापालिकेवर सुमारे ३,२०० कोटींचे दायित्व आहे. यामुळे येत्या काळात कामगारांचे पगार निघतील अथवा नाही अन् ठेकेदारांची बिलेदेखील निघतील की नाही, याबाबत आता शंका उपस्थित झाल्या आहेत. उत्पन्नाचे मुख्य स्रोत गेल्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी इतर स्रोत निर्माण करून ते वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मार्चमध्ये कोरोनाने दस्तक दिल्याने उत्पन्नावरही परिणाम होऊन ते २,३९७.६२ कोटी झाले आहे. आता त्याच्या आधारावरच काही महिन्यांचा गाडा हाकावा लागणार असून कर्मचाऱ्यांचे पगार, कोरोनाच्या उपाययोजनांवरील खर्च, ठेकेदारांची अत्यावश्यक कामांची बिले आदी द्यावीच लागणार आहेत. शिवाय ३,२०० कोटींच्या दायित्वापैकी थोडी रक्कमही द्यावी लागणार आहे.आता नव्याने आलेले आयुक्त विजय सिंघल यांनी आतापासूनच उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा तयार केला असून त्यातून किती आणि काय साध्य होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जास्तीच्या खर्चाचे प्रस्ताव रद्द करणे किंवा ते नंतर घेणे, यावर भर द्यावा लागणार आहे.28.36 कोटींचे उत्पन्न मागील वर्षी एप्रिलमध्ये पालिकेला मिळाले होते. यंदा मात्र याच महिन्यात शून्य उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामुळे महापालिका आता मालमत्ताकराची आणि पाणीबिलाची बिले तयार करीत असून ती ठाणेकरांना दिली जाणार आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता ठाणेकर वेळेत बिल भरतील का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.कोटींचे उत्पन्न शहर विकास विभागास मागील वर्षी मिळाले होते. परंतु, आता कोरोनामुळे गृहप्रकल्पांवरदेखील परिणाम झाला असून नव्याने प्रकल्प येतील का? याबाबतही शंका आहे. त्यामुळे या प्रमुख उत्पन्नावरदेखील पाणी सोडावे लागणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस