शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या घटली; केवळ ९६७ रुग्ण आढळले तर ३७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:09 IST

ठाणे महापालिकेने आज १९३ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३ हजार ४८८ रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७५१ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे -  कोरोनाचे ९६७ रुग्ण जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळले आहेत. यामुळे एक लाख सात हजार ५३३ रुग्ण आता जिल्ह्यात झाले आहेत. आज ३७ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आता तीन हजार ७५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्ण संख्या घटल्याचे उघड झाले आहे.ठाणे महापालिकेने आज १९३ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३ हजार ४८८ रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७५१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण - डोंबिवलीत आज २५० रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधीत रुग्ण झाले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत ५०३ मृतांची नोंद झाली आहे.नवी मुंबईत २४० रुग्णांची आज नोंद झाली आहे. तर पाच जण दगावले आहेत. आता नवी मुंबईत बाधीत २१ हजार १४० तर, ५११ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आज आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत सात हजार ४०९ बाधीत, तर १८५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त चार रुग्ण सापडले आहेत. या शहरात आजपर्यंत तीन हजार ९२७ बाधीत झाले आहेत. आज दोन मृतांची नोंद झाली असून शहरात आजपर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा - भाईंदरला नवीन ९८ रुग्ण सापडले तर सहा जणांच्या मृत्यूची आज नोंद झाली. या शहरात आता बाधीत दहा हजार ८११असून ३६७ मृत्यू आजपर्यंत नोंदवले आहेत.अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहे. आता या शहरात चार हजार ५०२ बाधीत रुग्णांची तर, १७४ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण आज वाढले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार ४८४ झाले. तर आज तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ६२ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज ६८ रुग्णांची नोंद झाली असून तिघे दगावले आहेत. आता बाधीत आठ हजार १०२ रुग्ण असून मृतांची संख्या २४९ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे