शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महाराष्ट्र कोरोनावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने पूर्वीप्रमाणे उभे राहील, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 16:51 IST

बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील 1024 बेड्सच्या कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे बोलत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

ठाणे  :  कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आजर्पयत आपल्या प्रत्येकाचे आयुष्य बदलले आहे. कोरोनाने प्रत्येकाला काही ना काही शिकविले आहे. आलेल्या संकाटाचा सामना कसा करायचा हे देखील कोरोनाने आपल्याला शिकविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील 1024 बेड्सच्या कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे बोलत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकांनी मदत केली. मुख्यमंत्री निधीसाठी एका 85 र्षीच्या महिला डॉक्टरांनी सकाळी धनादेश सुपुर्द केला असून त्या एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या मातोश्री असल्याचेही त्यांनी सांगितले. विदेशात जी औषधे वापरली जात आहेत, ती औषधे आपण राज्यात कोरोना बाधीत रुग्णांसाठी वापरली असल्याचेही त्यांनी सांगितले, कोरोनाचा सामना करतांना राज्याने कशा प्रकारे योगदान दिले याची माहिती मी पंतप्रधान मोदी यांना व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे दाखविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मैदानातील हॉस्पीटल ही तात्पुरत्या स्वरुपाची आहेत, मात्र त्याठिकाणी आपण आयसीयु बेड, वीज, पाणी व शौचालयार्पयत सर्वच सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या या काळात वैद्यकीय मदतही तितकीच महत्वाची ठरली असून कोरोना रुग्णांसाठी काम करणारे डॉक्टर, नेर्सेस, वॉर्डबॉय यांच्या रुपात देव काम करीत असल्याचेही दिसत आहे, असेही ते म्हणाले.बीकेसी मैदान आणि ठाणो येथे उभारण्यात आलेली दोन्ही रुग्णालये युध्द पातळीवर उभारण्यात आली असून त्याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील दोन महिन्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे. आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कोणावरही येऊ नये अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.कोरोनाला रोखण्यासाठी आपण वस्ती पातळीवर ऑक्सीजन तपासणी सुरु केली आहे. 55 वर्षे वयोगटातील यात खासकरुन तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोवीडच्या रुग्णांची लवकर ओळख होत असून त्यामुळे त्या रुग्णावर उपचार करणोही सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले. धारावी हे मुंबईतील कोरोना बाधीत रुग्णांचे सर्वात मोठे हॉटस्पॉट होते. परंतु आता तेथील परिस्थितीतही सुधारणा झालेली आहे. धारावीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या देखील आता घटत असून येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले राज्य या कोरोनावर मात करेल आणि पुन्हा नव्या उमेदीने आपण पहिल्या सारख्या राहू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी त्यांच्या समवेत ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आयुक्त विजय सिंघल आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे