शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊननंतरही अनावश्यक गर्दी टाळा!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चा वेबिनार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 01:09 IST

सोसायटीतील प्रत्येकाने सहकार्य करावे

ठाणे : सध्याचा लॉकडाउन संपला, तरी नंतर किमान वर्षभर प्रत्येकाला अनावश्यक गर्दी टाळावी लागेल. त्याची सवय करून घ्या. सध्याच्या काळात सोसायटीतील प्रत्येकाने आपापल्या परीने अन्य सदस्यांना सहकार्याचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये करण्यात आले.

‘लोकमत’ आणि महासेवातर्फे शनिवारी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘कोरोना संकटात गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यायची खबरदारी,’ या विषयावर वेबिनार पार पडला. प्रीती किचन अप्लायन्सेसद्वारा समर्थित सारस्वत बँकेद्वारे तो सादर करण्यात आला. ‘लोकमत बेस्ट सोसायटी’ पुरस्काराच्या योजनेचा वेबिनार हा एक भाग होता. यात ५८० सोसायट्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या विषयातील तज्ज्ञांसोबतच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनीही या वेबिनारमध्ये सहभागी होऊन सदस्यांना मार्गदर्शन केले. काही सूचना केल्या.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, सर्व गृहनिर्माण संस्था नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. काळजी घेत आहेत. हे करताना कुणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जर आपल्या सोसायटीत कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळला, तर त्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी सोसायट्यांना केले. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्व सोसायट्यांना केले.नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नोकरीनिमित्त बाहेरून आलेल्यांमुळे नवी मुंबईत कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचा मुद्दा मांडला. नवी मुंबई बाजार अ‍ॅपद्वारे धान्य पुरवठ्याची केलेली सोय, २४ तास टोल फ्री क्रमांकाद्वारे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याचा तपशील त्यांनी दिला. सर्व नागरिकांना नियम पाळण्याचा आणि कोरोनाबाधितांना सहकार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोसायटीतील राजकारण सोडून व्यवस्थापकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधाच्या लढ्यात ठाणे महानगरपालिका रात्रंदिवस काम करत आहे, तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊननंतरही पुढील वर्षभर अनावश्यक गर्दी टाळावी, असे त्यांनी सांगितले.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, मी बिंबीसारनगरमध्ये राहतो. कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आमची सोसायटी सील केली होती. कुणीही बाहेर जाऊ शकत नव्हते व बाहेरून येऊ शकत नव्हते. कोरोनाची झळ आम्ही खूप जवळून अनुभवली.भरघोस प्रतिसाद : मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथील अनेक गृहनिर्माण संस्थांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. ओबेरॉय स्प्लेंडर- गोरेगाव, सॅटेलाइट पार्क- जोगेश्वरी, एसबीआय कॉलनी- नेरुळ, विजयनगर- अंधेरी, सहयोग सोसायटी- नागपूर, महिंद्रा स्प्लेंडर- भांडुप, मोराज सोसायटी- वाशी या व इतर अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना या वेबिनारमध्ये आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या