Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्ण नव्याने आढळले; दहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 20:37 IST2020-11-24T20:37:14+5:302020-11-24T20:37:31+5:30
उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ६७२ नोंदली असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे.

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्ण नव्याने आढळले; दहा जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्णं मंगळवारी आढळले आहेत. तर, १० जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख २४ हजार ७५३ झाली असून मृतांची संख्या पाच हजार ६१९ नोंदली आहे.
ठाणे शहरात १२१ बाधीत सापडल्याने या शहरात आता ५० हजार१९१ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार २१७ झाली. कल्याण - डोंबिवलीत १७६ रुग्णांची वाढ झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५२ हजार ९७१ रुग्ण बाधीत असून एक हजार ४७ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.
उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ६७२ नोंदली असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे. भिवंडीला नऊ बाधीत आढळले असून एक मृत्यू झाला. आता बाधीत सहा हजार १९९ असून मृतांची संख्या ३४१ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६६ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाला आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २३ हजार ८२८ असून मृतांची संख्या ७५३ आहे.
अंबरनाथला १७ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सात हजार ७६३ झाले असून मृतांची संख्या २८५ आहे. बदलापूरमध्ये २३ रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार ८५७ आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या ९८ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत ३९ रुग्ण नव्याने वाढले असून एक मृत्यू झाला.ग्रामीण भागात आता १७ हजार ९०२ बाधीत झाले असून ५६१ मृत्यू झाले आहेत.