coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ५४३ रुग्ण; केवळ सहा जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 09:14 PM2020-11-14T21:14:04+5:302020-11-14T21:14:47+5:30

Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४३ रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. यासह जिल्ह्यात दोन लाख १९ हजार १११ रुग्णांची नोंद झाली आहे. आज केवळ सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५१५ झाली आहे. 

coronavirus: 543 corona patients found in Thane district today; Only six died | coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ५४३ रुग्ण; केवळ सहा जणांचा मृत्यू  

coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ५४३ रुग्ण; केवळ सहा जणांचा मृत्यू  

Next

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे ५४३ रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. यासह जिल्ह्यात दोन लाख १९ हजार १११ रुग्णांची नोंद झाली आहे. आज केवळ सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५१५ झाली आहे. 

ठाणे परिसरात १५६ रुग्ण सापडले आहेत. या शहरात ४९ हजार ७४६  रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एक हजार ११८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. कल्याण - डोंबिवलीत १४७ रुग्णांची वाढ असून एकाचा मृत्यू आहे. आतापर्यंत ५१ हजार ६९८ रुग्ण बाधीत झाले असून एक हजार २७ मृतांची नोंद करण्यात आली. 

उल्हासनगरला १८ रुग्ण शोधण्यात आले असून एकही मृत्यू नाही. या शहरात दहा हजार ४७४ रुग्णांसह मृतांची संख्या ३४८ नोंदली आहे. भिवंडी शहरात १५ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार ९५ असून मृतांची संख्या ३३८ आहे. मीरा भाईंदरमध्ये १९ रुग्ण सापडले आहेत. आता बाधितांची संख्या २३ हजार ३५७ झाली असून एकही मृत्यू नसल्याने मृतांची ७४४ कायम आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधीत सात हजार ५७७ झाले असून मृत्यूची संख्या २८२ आहे. बदलापूरला २१ रुग्णांसह आता बाधीत सात हजार ६४३ झाले आहेत. या शहरात ९८ मृत्यू कायम आहे.  जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमध्ये ६३ रुग्णांसह बाधीत १७ हजार ४३६ रुग्ण नोंदले गेले. तर, एकही मृत्यू नसल्याने मृतांची ५५२ कायम आहे. 

Web Title: coronavirus: 543 corona patients found in Thane district today; Only six died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.