coronavirus: चिंता वाढली : बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:10 AM2021-04-03T03:10:53+5:302021-04-03T03:11:38+5:30

coronavirus in Badlapur : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत.  अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.

coronavirus: 401 children infected with coronavirus in three months in Badlapur | coronavirus: चिंता वाढली : बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

coronavirus: चिंता वाढली : बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

Next

- पंकज पाटील 
अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत.  अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे समस्त पालकवर्गाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जात आहेत. कारण, या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणेही दिसत आहेत.  ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही या नव्या कोरोनाची लक्षणे आहेत. हीच लक्षणे मुलांसाठी घातक ठरत आहेत. यापूर्वीही मुलांना कोरोनाची लागण होत होती. मात्र, मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा जास्त असल्याने मुले लवकर बरी होत होती. मात्र, नव्या कोरोनामध्ये होत असलेले जुलाब, उलट्या हे त्रास मुलांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.  

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या पाहता बदलापूर शहरात मागील तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शून्य ते ५ वयोगटातील ८८, ६ ते १० वयोगटातील ९६, ११ ते १५ वयोगटातील ११३, तर १६ ते २० वयोगटातील १०४ लहान मुलांचा समावेश आहे.  

अंबरनाथ शहरात  २१५ जणांना लागण 
अंबरनाथमध्येही मागील दोन महिन्यांत २१५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील २२, ६ ते १० वयोगटातील ४४, ११ ते १५ वयोगटातील ६२, १६ ते २० वयोगटातील ८७ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या संख्येमुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार असली, तरी मुलांची काळजी घेणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत.

Web Title: coronavirus: 401 children infected with coronavirus in three months in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.