शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 3:32 PM

नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ठळक मुद्दे नव्या रुग्णांमध्ये एक पुरुष व महिलेसह सहा महिन्याचा बाळाचा समावेशकेडीएमसी महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24

कल्याण - कल्याणडोंबिवलीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज महापालिका हद्दीत 3 नवे रुग्ण आढळून आले.महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे.  नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे.3 रुग्णापैकी एक रुग्ण हा डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील आहे. याच परिसरातील भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व भाजप नगरसेविका कविता म्हात्रे यांनी परिसरातील नागरीकांना आवाहन केले आहे. या परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. परिसरातील नागरीकांनी घराबाहेर फिरु नये. घराबाहेर निघून फिरताना नियम तोडताना आढळून आल्यास संबंधितांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाईल अशा इशारा दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासित असलेली 60 वर्षीय महिला व सहा महिन्याचे बाळ हे कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील आहे.कालर्पयत महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 होती. आत्ता त्यात नव्या 3 रुग्णांची भर पडली आहे. डोंबिवलीतील वादग्रस्त लग्न सभारंभात उपस्थित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा अंती ही महिला बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. ही महिला धरुन यापूर्वी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णापैकी पाच जणांना तपासणी अंती घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कस्तूरबा रुग्णालयात महापालिका क्षेत्रतील 19 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.दरम्यान महापालिका हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोनासाठी स्वतंत्र अत्याधुनिक रुग्णालय सुरु करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासमोर एक इमारत महापालिकेच्या ताब्यात आहे. वैद्यकीय वापरारासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. त्याठिकाणी 10 हजार चौरस फूटाची जागा आहे. या जागेत कोरोनासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज रुग्णालय तातडीने सुरु करता येऊ शकते. याचा विचार करण्यासाठी आयुक्तांनी त्याठिकाणी जाऊन स्वत: पाहणी करावी. उपलब्ध  तयार इमारतीतील जागेचा वापर वैद्यकीय कारणासाठी करावा. जेणे करुन रुक्मीणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयावर वैद्यकीय ताण येणार नाही याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली