CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात रविवारी समोर आले २ हजार ७४४ नवे कोरोना बाधित, ४२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:30 PM2021-05-02T22:30:46+5:302021-05-02T22:35:10+5:30

ठाणे मनपा परिसरात रविवारी ७५६ रुग्ण आढळून आले. यांसह येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ४०९ वर गेली आहे. (CoronaVirus)

CoronaVirus: 2 thousand 744 new corona infected in Thane district on Sunday, 42 dead | CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात रविवारी समोर आले २ हजार ७४४ नवे कोरोना बाधित, ४२ जणांचा मृत्यू

CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात रविवारी समोर आले २ हजार ७४४ नवे कोरोना बाधित, ४२ जणांचा मृत्यू

Next


ठाणे- कोरोना व्हायरसने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार ७४४ नवे रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल चार लाख ७२ हजार ७९४ रुग्ण समोर आले असून मृतांचा आकडा सात हजार ६८५ वर पोहोचला आहे. (CoronaVirus: 2 thousand 744 new corona infected in Thane district on Sunday, 42 dead)

ठाणे मनपा परिसरात रविवारी ७५६ रुग्ण आढळून आले. यांसह येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ४०९ वर गेली आहे. या शहरात आजही आठ बाधीत दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ६८९ झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात ७२९ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या एक लाख २२ हजार २७५ झाली. दिवसभरातील आठ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ४५३ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

उल्हासनगरला आजही ७४ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्ण संख्या १९ हजार २३ झाली असून ४३६ मृतांची नोंद केली गेली. भिवंडीला दिवसभरात २४ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण नऊ हजार ८९६ झाले असून ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदरला आज २६२ रुग्णांसह आठ मृतांची नोंद झाली. आता येथील एकूण रुग्ण संख्या ४४ हजार १८९ वर पोहोचली असून १ हजार ४९ जणांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
 
अंबरनाथला १०३ रुग्णांच्या वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्ण संख्या आता १७ हजार ९४८ झाली आहे तर ३८८ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये १४९ रुग्णांची भर पडली आहे. मात्र आज येथे एकही मृत्यू नाही. आता येथील १८ हजार ८०५ रुग्णांसह १९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज २२३ रुग्ण आढळून आले असून दोन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत २७ हजार पाच रुग्णांची वाढ होऊन ६९६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus: 2 thousand 744 new corona infected in Thane district on Sunday, 42 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.