coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले कोरोनाचे १,४२७ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:43 AM2020-08-31T07:43:23+5:302020-08-31T07:43:54+5:30

ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

coronavirus: 1,427 coronavirus patients in Thane district on Sunday | coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले कोरोनाचे १,४२७ रुग्ण

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले कोरोनाचे १,४२७ रुग्ण

Next

ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या तीन हजार ५१९ झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून पुढे आली आहे.
ठाणे मनपा हद्दीत २०८ नवे रु ग्ण सापडले आहेत. त्यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण २५ हजार ७२१ रु ग्ण झाले आहेत. रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ८३४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपात रविवारी ३६३ रु ग्ण नव्याने आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरांतील मृतांची आजवरची संख्या ६२० झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २८ हजार ६३७ पर्यंत नोंदवली गेली आहे.
उल्हासनगरला ३४ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या सात हजार ७५७ वर पोहोचली आहे, तर आज एकाचा मृत्यू झाल्यामुळे २२५ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.
भिवंडी मनपा हद्दीत १२ रु ग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेली नाही. येथे आजपर्यंत चार हजार १८० बाधितांची, तर २८३ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेमध्ये १२५ रुग्णांची भर पडली, तर एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण बाधितांची संख्या १२ हजार ४५६, तर ४२० मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.
अंबरनाथ शहरात ४० रु ग्ण नव्याने आढळून आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत चार हजार ९३९ बाधित, तर १८५ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ३२ रु ग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण चार हजार ७७ झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृतांची संख्या ७१ कायम आहे.

ग्रामीण भागात १३७ रुग्णांची वाढ
ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागांत १३७ रु ग्णांची वाढ झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावपाड्यांत आतापर्यंत नऊ हजार ३३८ बाधित रुग्ण झाले असून, ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत ४७६ नवीन रुग्णांची भर
मागील २४ तासांत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५,८६0 इतकी झाली आहे. यापैकी २१,७१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५६२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
नवी मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्के इतके आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ५८१ इतकी आहे. मागील २४ तासांत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नेरूळ विभागातून सर्वाधिक म्हणजेच ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे बेलापूर विभागातून ४६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुर्भे ५0, कोपरखैरणे ७४, घणसोली ४९ आणि ऐरोली विभागातून तब्बल १२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

वसई-विरारमध्ये १२४ रुग्ण कोरोनामुक्त
वसई-विरार शहरात रविवारी दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १३५ नवे रुग्ण आढळून आले असून १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १६ हजार ६०७ वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रुग्णांची संख्या १४ हजार ३७४ इतकी झाली आहे. महापालिका हद्दीतील मृतांची संख्या ३५५ वर पोहोचली असून शहरात विविध रुग्णालयांत आता केवळ १ हजार ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत.

रायगडमध्ये ५१४ नव्या रु ग्णांची नोंद

अलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी ३० आॅगस्ट रोजी ५१४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २२ हजार ७०७ वर पोहोचली आहे. त्यापैकी २२ हजार ८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २१८, पनवेल ग्रामीणमध्ये ६०, उरण २०, खालापूर २०, कर्जत १९, पेण २७, अलिबाग ४३, मुरूड ७, माणगाव ३८, रोहा २०, सुधागड ११, श्रीवर्धन १, महाड २६, पोलादपूर ४ असे एकूण ५१४ रुग्ण सापडले आहेत.
दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२६, पनवेल ग्रामीण ६२, उरण १, खालापूर ६, कर्जत ३, पेण ५, अलिबाग ३४, माणगाव १५, रोहा २६, सुधागड ३, श्रीवर्धन २, म्हसळा ७, महाड २३, पोलादपूर ८ असे एकूण ३२१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत बाधितांपैकी २२ हजार ८४५ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८०० रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ३४९२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: 1,427 coronavirus patients in Thane district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.