शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १२७७ रुग्णं नव्याने वाढले; २७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 8:07 PM

Thane corona virus news: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख ८२ हजार ७७६ झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजार ६१६ झाली आहे. 

ठाणे  - जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार २७७ रुग्ण सोमवारी नव्याने सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख ८२ हजार ७७६ झाली आहे. तर, २७ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ६१६ झाली आहे.   ठाणे परिसरात आज २८४ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ३८ हजार ६३२ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजपर्यंत एक हजार २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात २८० रुग्णांची आज वाढ झाली असून सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४४ हजार ६४ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ८५७ आहे. उल्हासनगरात आज २७ नवे रुग्ण आढळले आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात रुग्णाची संख्या नऊ हजार ३९९ झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३०९ झालेली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात आज २२ बाधीत आढळले आहेत. एकाचाही मृत्यू झाला नाही. आता या शहरात बाधितांची संख्या पाच हजार २३० झाली असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७२ रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची आज नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजार ४२१ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९८ झाली आहे. अंबरनाथमध्ये ३९ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात बाधितांची संख्या सहा हजार ५३० झाली आहे. तर, मृतांची संख्या २३६ आहे. बदलापूरमध्ये ५७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ४५१ झाली आहे. या शहरात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात ३० रुग्णांची वाढ झाली आहे. तर, एका जणाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १४ हजार ५५४ असून मृतांची संख्या ४१४ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे