Coronavirus: जव्हार तालुक्यात नवीन 12 पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:41 IST2020-06-15T21:40:50+5:302020-06-15T21:41:00+5:30

101 रुग्णांचे नमुन्यात शुक्रवारी 37 नमुने पाठविण्यात आले तर शनिवारी 47 नमुने तर रविवारी 17 नमुने पाठविण्यात आले होते

Coronavirus: 12 new positive patients in Jawahar taluka; A total of 23 patients tested positive | Coronavirus: जव्हार तालुक्यात नवीन 12 पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह

Coronavirus: जव्हार तालुक्यात नवीन 12 पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह

हुसेन मेमन

जव्हार - खाजगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील तथा लग्न कार्यासाठी उपस्थित मंडळीच्या संपर्कातील जव्हार तालुक्यातुन शुक्रवार ते रविवार पर्यंत 101 रुग्णांचे स्वाबचे नमुने तीन टप्प्यात पाठविण्यात आले होते, त्यातील 65 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यात 12 पॉझिटिव्ह तर 53 निगेटिव्ह अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

101 रुग्णांचे नमुन्यात शुक्रवारी 37 नमुने पाठविण्यात आले तर शनिवारी 47 नमुने तर रविवारी 17 नमुने पाठविण्यात आले होते, यातील शुक्रवारी पाठविण्यात आलेले 37 पैकी 18 नमुने तपासण्यात आले असून यातून 12 पॉझिटिव्ह तर 6 निगेटिव्ह प्राप्त झाले तर उर्वरित अहवाल अप्राप्त आहेत, तसेच शनिवारी पाठविण्यात आलेले 47 चे 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, तसेच रविवारी पाठविण्यात आलेले 17 नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.

दरम्यान अद्याप पर्यंत जव्हार तालुक्यात 101 नमुन्यात 65 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, 12 पॉझिटिव्ह तर 53 निगेटिव्ह असा अहवाल प्राप्त झाला असून उर्वरित 36 रुग्णांचे अहवाल मंगळवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. सोमवार सायंकाळ पर्यंत जव्हार तालुक्यात एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह असून यातील 2 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

Web Title: Coronavirus: 12 new positive patients in Jawahar taluka; A total of 23 patients tested positive