Corona's havoc in Khopat Bus Depot No. 1; If the carrier, including the vehicle tester, dies, 43 people are infected | खोपट बसडेपो क्रमांक १ मध्ये कोरोनाचा कहर; वाहन परीक्षकासह वाहकाचा मृत्यू तर, 43 जणांना लागण

खोपट बसडेपो क्रमांक १ मध्ये कोरोनाचा कहर; वाहन परीक्षकासह वाहकाचा मृत्यू तर, 43 जणांना लागण

ठाणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीने आण करणा:या लालपरीच्या अर्थात एसटीच्या तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्दाकायक माहिती समोर आली आहे. यामध्ये वाहन परीक्षकासह वाहकाचा शुक्र वारी एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता खोपट बस डेपो क्र मांक 1 मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत 43 जणांना लागण झाली आहे. असे असतांना, संपूर्ण डेपो बंद न करता केवळ विश्रंती कक्ष सील करून कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसुन कर्मचा:यांच्या जीवाशी खेळ सुरु  आहे का असा सवाल देखील कर्मचा:यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे शनिवारी दुपारी कर्मचा:यांनी संबधींत अधिका:यांची भेट घेऊन, डेपो सील करण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हा र ग्णालयासह, छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या पाठोपाठ आता अत्यावश्यक सेवा पुरविणा:या एसटी विभागातील वाहन चालक, वाहक यांच्यासह वाहन परीक्षक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्च पासून टाळेबंदी करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचा:यांना कार्यालयातून ने-आण करण्याबरोबरच परराज्यातून कामानिमित्त आलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर घेवून जाण्यासाठी एसटी महामंडळाने महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, आता याच अत्यावश्यक सेवे पुरविणा:या एसटी विभागालाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या खोपट एसटी बस डेपो क्र मांक 1 येथून अत्यावश्यक सेवेत काम करणा:या कर्मचा:यांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रलय सीएसटी या भागात सेवा देण्याचे काम करीत आहे. मात्र, याच डेपोमध्ये सध्याच्या घडीला 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कर्मचा:यांनी दिली आहे. परंतु संबधीत प्रशासनाने 43 जणांना लागण झाल्याचा दावा केला आहे. तर शुक्र वारी एकाच दिवशी या आजाराने वाहक आणि वाहन परीक्षक दगावले आहे.

त्यामुळे या विभागात काम करणा:या कर्मचा:यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी त्यांन खोपट विभागाच्या प्रमुखांना भेटून निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी डेपो बंद करावा अशी मागणी केली आहे, तसेच सॅनिटायझरने स्वच्छ करावे असेही सांगितले आहे. तर एसटीच्या बसेस या रोजच्या रोज सॅनिटायझरने स्वच्छ कराव्या अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, शहापूर येथील डेपोमध्ये 14 कर्मचारी पॉझटिव्ह सापडल्यामुळे तेथील वैदयकीय अधिकारी यांनी पूर्ण डेपो बंद करण्यास सांगितले. मात्र, खोपट डेपो क्र मांक 1 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचा:यांना कोरोनाची लागण झाल्याचे माहित असून देखील संपूर्ण डेपो बंद न करता केवळ विश्रंती कक्ष सील करण्यात आले. त्यामुळे एसटी प्रशासनाचा कर्मचा:यांच्या जीवाशी खेळ सुरु  आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आल आहे.

 या संदर्भात एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिका:यांशी चर्चा करून तत्काळ खोपट डेपो क्र मांक 1 चे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच तो डेपो लगेच सील करावा, तसेच येथील कर्मचा:यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात यावी.
- सचिन शिंदे, ठाणो जिल्हाध्यक्ष, इंटक.

Web Title: Corona's havoc in Khopat Bus Depot No. 1; If the carrier, including the vehicle tester, dies, 43 people are infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.