शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:19 AM

कल्याण-डोंबिवलीत दिलासादायक चित्र : रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४ टक्के : मृत्युदरही घटला

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याचे प्रमाण जास्त असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के आहे. हे प्रमाण वाढत असल्याने ही एक समाधानकारक बाब असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.  आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या १० हजार ९६२ होती. एका दिवसात १ हजार ७५२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मृत्युदर हा १.१९ टक्के आहे. त्यामुळे मृत्युदर कमी आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही जमेची बाजू आहे. 

महापालिका हद्दीत दररोज ४ हजार ५०० जणांची अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. रुग्ण आढळण्याचा दर हा १४.७४ टक्के आहे. मागच्या महिन्यात तो २३ टक्के होता. आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार हा दर १० टक्क्यांच्या आत हवा. तो कमी करण्यासाठी महापालिकेकडून चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. महापालिका हद्दीत सध्या ३२ चाचणी केंद्रे आहेत. ती वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात होती. मात्र सध्या संचारबंदीमुळे प्रवासावर बंदी असल्याने चाचणीचे प्रमाण ५००ने घटले आहे. तरी चाचणी वाढविण्याकरिता महापालिकेच्या हेल्थ पोस्टमध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिकेने आता नव्याने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियनची कंत्राटी भरतीची प्रक्रिया राबविली आहे. ही  पदे भरल्यास चाचणी केंद्रे वाढविणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७२६ जणांचे लसीकरण 

जानेवारी महिन्यापासून महापालिका हद्दीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७२६ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी लसीचा पहिला डोस १ लाख ४८ हजार ३७२ जणांना देण्यात आला आहे. दुसरा डोस २५ हजार ३५४ जणांना दिला गेला आहे. 

सध्या लसीचे डोस केंद्राकडून उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया मंदावली आहे. महापालिकेची आणि खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहे. केवळ कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचे लसीकरण केंद्र सुरू आहे. १८ ते ४५ वयोगटादरम्यानच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दिवसाला केवळ ५०० डोस उपलब्ध होत आहेत. 

ऑनलाइन स्लॉट रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लसीचा डोस दिला जात आहे. महापालिकेने सात लाख लसीच्या डोसची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होताच महापालिकेच्या अन्य लसीकरण केंद्रासह खासगी रुग्णालयातील लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांनी दिली आहे.  

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या