Corona Virus News: ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या नवरदेवासह २२ जणांविरुद्ध गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Published: May 16, 2021 09:53 PM2021-05-16T21:53:23+5:302021-05-16T21:57:12+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत हळदीच्या कार्यक्रमात वºहाडी मंडळींची नियमबाहय गर्दी करुन सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविणाºया करण पाटील (३०, रा. बाळकुम, ठाणे) या नवरदेवासह २२ वºहाडी मंडळींवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

Corona Virus News: Crime against 22 people including Navradeva for violating prohibition order in Thane | Corona Virus News: ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या नवरदेवासह २२ जणांविरुद्ध गुन्हा

हळदीच्या कार्यक्रमांत भन्नाट गर्दी

Next
ठळक मुद्देसोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी हळदीच्या कार्यक्रमांत भन्नाट गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत हळदीच्या कार्यक्रमात वºहाडी मंडळींची नियमबाहय गर्दी करुन सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविणाºया करण पाटील (३०, रा. बाळकुम, ठाणे) या नवरदेवासह २२ वºहाडी मंडळींवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
कोरोनामुळे राज्यासह ठाणे जिल्हयात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे सध्या अवघ्या २५ नातेवाईकांमध्येच विवाह समारंभाला परवानगी दिलेली आहे. यात हळदी समारंभाचा समावेश नाही. मात्र, तरीही १२ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पाटील कुटूंबीयांनी लग्नानिमित्त बाळकूम पाडा क्रमांक एक येथील गणेश बावडीजवळ हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सामाजिक अंतर न राखता पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आले होते. त्यातही विवाहासाठी असलेली २५ लोकांचीही मर्यादा ओलांडण्यात आली. त्यामुळे ३० एप्रिल २०२१ रोजी पोलीस आयुक्तांनी काढलेला कोरोना संदर्भातील मनाई आदेशाचा भंग केल्यामुळे नवरदेवासह नवरदेवाचे पिता भरत पाटील (५६), नवरदेवाची आई वनिता (५४) तसेच प्रतिक पाटील (३०), तेजस पाटील (१८) आदी २२ जणांसह इतरांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ तसेच २६९, २७० नुसार कापूरबावडी पोलिसांनी १३ मे रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाटील कुटूंबीयांना नोटीस बजावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. मांढरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Corona Virus News: Crime against 22 people including Navradeva for violating prohibition order in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.