शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

Corona Vaccine : लसीच्या तुटवड्याने मीरा भाईंदरमध्ये दिला जात आहे फक्त दुसरा डोस; नागरिकांमध्ये संताप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 18:05 IST

Corona Vaccine In Mira Bhayander : शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशील्डच्या केवळ ३३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने दुसरा डोस असणाऱ्या केवळ ५०० जणांनाच लस दिली. लस नसल्याने पालिकेने ६ लसीकरण केंद्र तात्पुरती बंद केली असून केवळ ५ केंद्रच सुरू ठेवली आहेत. लस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.

शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती. तर खाजगी ९ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने जास्तीजास्त नागरिकांना कोरोनाची लस लवकर मिळावी म्हणून रोजच्या ३ ते साडे तीन हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून देखील रोज सुमारे ५ हजार लोकांना लस दिली जात होती.

गुरुवार रात्रीपर्यंत महापालिकेकडे केवळ ३३४० लसच शिल्लक राहिल्या. शासनाकडून लस येणे तूर्तास अवघड असल्याने पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चर्चा करून शुक्रवार पासून मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन केंद्रातील लसीकरण तापुरते बंद केले.

शुक्रवारपासून भीमसेन जोशी रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्र ह्या ५ ठिकाणीच लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. नव्याने लस देणे बंद केले असून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अश्या लोकांनाच दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर फक्त १०० लोकांनाच लस दिली जात आहे. म्हणजेच लस चा साठा येत नाही तो पर्यंत रोज एकूण ५०० लोकांनाच लस दिली जाणार आहे.

जेणे करून आज लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्र बंद झाल्याचे तर ज्या ५ ठिकाणी केंद्र सुरु होते तेथे केवळ दुसऱ्या डोस ची लस दिली जाणार असल्याचे समजल्यावर संताप व्यक्त होत होता. काठी ठिकाणी हुज्जत घातली जात होती. लस नसल्याने अनेक लोक रिकाम्या हाताने परत गेले. केवळ १०० लोकांनाच लस द्यायची असल्याने दुपारनंतर लसीकरण केंद्रावर शुकशुकाट होता.

पंतप्रधान म्हणाले की,  लसीकरण उत्सव साजरा करायचा. पण आम्हाला लस मिळणारच नसेल तर हा कसला उत्सव असा संताप काहींनी व्यक्त केला. तर केंद्र व राज्य शासनाच्या राजकीय वादातून सामान्य नागरिक मात्र लसीकरण अभावी जीव गमावण्यास कारणीभूत ठरल्याचा रोष काहींनी व्यक्त केला.

डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - शासनाकडून लसीचा पुरवठा सुरू होताच पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल. सध्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे. तेथे रोज दुसरा डोस बाकी असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांना लस दिली जात आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाईन नोंदणी करावी. केंद्रात सर्व सुविधा व आवश्यक कर्मचारी तैनात आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर