सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनावेळी कोरोना नियमाचा फज्जा, आमदारांवर टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:09 IST2021-08-28T16:04:23+5:302021-08-28T16:09:29+5:30
Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरातील प्रभाग क्रं-७ च्या नगरसेविका लक्ष्मी सिंग यांनी नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक निधीतून सार्वजनिक शौचालय उभारले.

सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनावेळी कोरोना नियमाचा फज्जा, आमदारांवर टीकेची झोड
सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका प्रभाग क्रं-७ च्या नगरसेविका लक्ष्मी सिंग यांच्या नगरसेवक निधीतून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी आमदार कुमार आयलानी, उपमहापौर भगवान भालेराव आदींच्या हस्ते झाले. यावेळी कोरोना नियमाचा फज्जा उडाल्याने, टीकेची झोड उठली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरातील प्रभाग क्रं-७ च्या नगरसेविका लक्ष्मी सिंग यांनी नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक निधीतून सार्वजनिक शौचालय उभारले. शौचालयाचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी, उपमहापौर भगवान भालेराव, भाजपाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी आदींसह भाजप नगरसेवकांच्या हस्ते झाले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोना नियमाचा सर्रासपणे भंग झाल्याने, सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. महापालिका व पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.