शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus News: लोकल सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:30 AM

CoronaVirus News: दररोज वाढतात सरासरी ६६ रुग्ण 

नवी मुंबई/ ठाणे / रायगड / पालघर : रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली केल्यानंतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ ते १२ फेब्रुवारी दरम्यान मनपा क्षेत्रात ७९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापुर्वीच्या १२ दिवसामध्ये ७१३ जणांना कोरोना झाला होता. सरासरीपेक्षा ८१ रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे सेवा सुरू होण्यापुर्वी प्रतिदिन सरासरी ५९ रुग्ण वाढत होते. लोकल सुरु झाल्यानंतर ही प्रमाणे प्रतिदिन सरासरी ६६ झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात ४३५ रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेतला असता १५ जानेवारीला लोकल सेवा सुरू झाली त्या दिवशी अवघे २९७ रुग्ण सापडले. त्यानंतरचे पहिले तीन दिवस अनुक्रमे ३७३, ३२५ आणि २२८ रुग्ण सापडले होते. या तर आताच्या गेल्या काही दिवसांच्या रुग्णसंख्येचा विचार करता शुक्रवारी २९० रुग्ण आढळले असून फक्त दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्या आधी गुरुवारी २७३, बुधवारी ३६४ रुग्ण सापडले होते. ९ फेब्रुवारीला २३६ आणि ८ फेब्रुवारीला केवळ २०० रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृतांच्या संख्येचा विचार करता मृतांची संख्या अत्यल्प आढळली. यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढल्याचे फारसे दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यातील काेराेनाचा कहर कमी झाला आहे. शुक्रवारी  पनवेल महापालिका हद्दील सर्वाधिक ३०, पनवेल ग्रामीणमध्ये ५, पेण तालुक्यात ४ खालापूर तालुक्यात ३ आणि अलिबाग तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील ५५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ६२ हजार ६०६ काेराेना रुग्णांची संख्या झाली आहे, तर ६० हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.विभाग     शुक्रवारची    आकडेवारी ठाणे    २९०नवी मुंबई    ७८रायगड    ४३वसई-पालघर    २४ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या