कोरोनाने १८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:26+5:302021-06-01T04:30:26+5:30
----------------------------------------------------- सातारा पॅटर्न राबवा कल्याण : सातारा महापालिकेप्रमाणो केडीएमसीने तीन महिन्यांची घरपट्टी माफ करून करदात्या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी ...

कोरोनाने १८ जणांचा मृत्यू
-----------------------------------------------------
सातारा पॅटर्न राबवा
कल्याण : सातारा महापालिकेप्रमाणो केडीएमसीने तीन महिन्यांची घरपट्टी माफ करून करदात्या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांनी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे वेतन मिळणे अवघड झाले आहे. अशातच नागरिकांना लाईट बिल, सोसायटी मेंटेनन्स, घरातील इतर खर्च व घरपट्टी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
------------------------------------------------------
क्रीडा संस्थांकडून गरजूंना अन्नधान्य वाटप
कल्याण : येथील शिवशाौर्य फाउंडेशनच्या वतीने उल्हासनगर तीन येथील बुद्धविहार कौशल्यनगर मोहटा देवी मंदिर याच्या आजूबाजूच्या गोरगरिबांना आणि गरजू लोकांना टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव संदीप ओंबासे यांच्या हस्ते रविवारी अन्नधान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात युथ ऑफ टुडेज अमू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब कल्याण यांचाही सहभाग होता. यावेळी शंभर कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले.
------------------------------------------------------